Sunday, August 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुन्हा चोरी करण्यासाठी साठी आला अन् वेल्हे पोलिसांच्या जाळ्यात अडकला

संदीप टूलेby संदीप टूले
Sunday, 16 August 2026, 18:17

पुणे, ता. 16 : वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत फॉर्म हाऊसच्या बांधकामासाठी ठेवलेले सुमारे 88 हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी चोरट्यांच्या टोळीचा छडा लावला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयित पिकअप टेम्पोचा पोलिसांनी पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आतापर्यंत तब्बल साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

वेल्हे तालुक्यातील घेवंडे गावच्या हद्दीत अॅड. सूरज ननवरे यांच्या फॉर्म हाऊसचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी तेथे विविध साहित्य आणून ठेवण्यात आले होते. मात्र, 9 ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे 88 हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेले. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात घरफोडीसह चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याची गंभीर दखल घेत वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी तपास पथक तयार करून चोरट्यांचा शोध सुरू केला. पोलिसांनी चोरीची पद्धत, संशयितांची हालचाल आणि परिसरातील माहितीच्या आधारे तपासाला वेग दिला.

दरम्यान, 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पोलीस हवालदार गजानन खत्री यांना चोरटे पुन्हा घेवंडे परिसरात चोरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत असताना काही नागरिकांना फॉर्म हाऊसजवळ एक पिकअप टेम्पो संशयास्पदरीत्या दोन-तीन वेळा घिरट्या घालताना दिसला.

 

नागरिकांनी चालकाला पिकअप थांबविण्यास सांगितले असता त्याने वाहन न थांबवता वेल्हेच्या दिशेने वेगाने पळ काढला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी नागरिकांच्या मदतीने संशयित पिकअपचा पाठलाग करून तो अडविला. मात्र, वाहनातील दोन संशयित डोंगर, झाडाझुडपांचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी पिकअप चालक रमेश बबन मरगळे याला ताब्यात घेतले.

आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौकशीत आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी आणि वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक देशमुख, पोलीस हवालदार गजानन खत्री, सोमेश राऊत, पोलीस अंमलदार युवराज सोमवंशी, बुद्धीवान मोरे, अजिंक्य बंडगर, आकाश पाटील, मयूर जगताप, शुभम कदम व सोमनाथ जाधव यांचा समावेश होता.

 

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५२३ कोटींचे कर्ज होणार माफ; तब्बल ६१ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Sunday, 16 August 2026, 20:39

शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा विमानतळावरच गोळीबार! बंदुकीतून दोन राउंड फायर; २ जण जखमी

Sunday, 16 August 2026, 19:30

अहिल्यानगर-पुणे बाह्यमहामार्गावर भीषण अपघात; दुचाकी चालकाचा मृत्यू

Sunday, 16 August 2026, 19:25

कदमवाकवस्तीत तरुणीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 16 August 2026, 18:52

लातूरवरून रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; आजोबासह नातवाचा मृत्यू

Sunday, 16 August 2026, 18:49

बारामतीत मोठा शस्त्रसाठा जप्त! सराईत गुन्हेगार गावठी पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह पोलिसांच्या जाळ्यात

Sunday, 16 August 2026, 18:43
Next Post

बारामतीत मोठा शस्त्रसाठा जप्त! सराईत गुन्हेगार गावठी पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह पोलिसांच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.