Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाप रे! बनावट सोनं ठेवून HDFC बँकेला 18 लाखांचा चुना, रांजणगावमधील धक्कादायक प्रकार; 12 जणांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 26 May 2026, 21:17

अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती: रांजणगाव येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत बनावट सोने खरे असल्याचे भासवून गोल्ड लोन घेत तब्बल 17 लाख 76 हजार 700 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत शैलेश लालासाहेब जाधव (वय 33, रा. शुक्रवार पेठ, पुणे) याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जानेवारी 2025 ते 28 मार्च 2025 या कालावधीत रांजणगाव येथील एचडीएफसी बँक शाखेत हा प्रकार घडला.

 

या प्रकरणात लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा), मच्छिंद्र दिगंबर खैरनार (रा. संकल्प सिटी, रांजणगाव), प्रतीक दादा मांडगे (रा. रांजणगाव मज्जिद, ता. श्रीगोंदा), किरण हौसराव सुरवसे (रा. कारेगाव, ता. शिरूर), ऋषिकेश मधुकर देशमुख (रा. बाभूळसर, ता. शिरूर), तन्मय नानासाहेब जगदाळे, दीपक नाना बोराडे (रा. शिरूर), बाजीराव सिताराम शेळके (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा), अभिषेक यशवंत जोंधळे (रा. शिरूर), मयूर रंगनाथ लंघे (रा. करडे, ता. शिरूर), संजय हिराचंद पंडित (रा. हडपसर, पुणे) आणि प्रवीण गवळी (रा. वाघोली, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक 3 ते 10 यांनी आरोपी लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर याच्या सांगण्यावरून बनावट सोने खरे असल्याचे भासवून बँकेत गहाण ठेवले. त्याआधारे बँकेकडून गोल्ड लोन घेत बँकेची लाखोंची फसवणूक करण्यात आली. तसेच, बँकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या गोल्ड लोन व्हॅल्युअर संजय हिराचंद पंडित याने संबंधित सोने बनावट असल्याची माहिती असूनही ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, 25 मे रोजी रात्री 9:56 वाजता आरोपी लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर व मच्छिंद्र दिगंबर खैरनार यांना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी लक्ष्मण वीर याला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर मच्छिंद्र खैरनार याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तिडके करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटचा पर्दाफाश! हेल्परचं निघाली सूत्रधार; महिलांना फार्महाऊवर घेऊन जायचे, सोनोग्राफी करायचे अन्…

Friday, 19 June 2026, 19:41

हडपसर – यवत व पुणे शिरूर उन्नत मार्गाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; काम सुरु होण्यापूर्वीच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आमदार राहुल कुल प्रयत्नशील

Friday, 19 June 2026, 19:04

दोघंही आयटी इंजिनिअर, कामानिमित्त भेटले, प्रेम जुळलं लग्न केलं अन् नंतर असं काही घडलं की विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल…

Friday, 19 June 2026, 18:57

‘तुझी बायको मला, माझी तुला!’ फेसबूकवरून चालते पार्टनर स्वॅपिंगचे गलिच्छ रॅकेट; एका रात्रीचे मिळतात 20 हजार

Friday, 19 June 2026, 18:14

वरवंड येथील “हॉटेल सिद्धेश्वर प्युअर व्हेज” मधून वीजचोरी; दोघांवर गुन्हा दाखल 

Friday, 19 June 2026, 18:09

हिंजवडी मेट्रो सज्ज! 6 ते 8 मिनिटांच्या अंतराने धावणार ट्रेन; तिकीट आता तुमच्या व्हॉट्सॲपवर

Friday, 19 June 2026, 18:06
Next Post

Ebola Cases : भारतात इबोलाचा संशयित रुग्ण? युगांडाहून आलेली तरुणी बंगळुरूत विलगीकरणात ; थकवा आणि कोणती आहेत लक्षणे वाचा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.