Ebola Cases : नवी दिल्ली : आफ्रिकेत इबोलाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असतानाच, युगांडाहून भारतात परतलेल्या २८ वर्षीय तरुणीला बंगळुरूत विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर २३ मे रोजी आगमनानंतर तिची प्रकृती संशयास्पद वाटल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. Ebola Cases :

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, संबंधित तरुणीमध्ये तापासारखी गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र तिला प्रचंड थकवा आणि अंगदुखी जाणवत असल्याने तिचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (NIV) पाठवण्यात आले आहेत. सध्या तिला बंगळुरूतील इंदिरानगर येथील साथरोग रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. Ebola Cases :

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात आल्यानंतर ती सुरुवातीला एका हॉटेलमध्ये राहिली होती. त्यानंतर सौम्य लक्षणे दिसू लागल्याने तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक अहवालाची प्रतीक्षा सुरू असतानाच नियमानुसार पुन्हा चाचणीही करण्यात येणार आहे. Ebola Cases :
दरम्यान, आफ्रिकेतील काही भागांत इबोलाचा संसर्ग वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडा येथे सुरू असलेल्या परिस्थितीला “आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी” घोषित केले आहे. त्यानंतर कर्नाटक आरोग्य विभागानेही इबोलाग्रस्त देशांतून परतणाऱ्या प्रवाशांना २१ दिवस स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. Ebola Cases :
भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथून येणाऱ्या प्रवाशांना ताप, अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायूदुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्त्रावासारखी लक्षणे आढळल्यास विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. Ebola Cases :






