‘Begging’ movement : यवत, (पुणे) : सहजपूर फाटा, नांदूर आणि खामगाव रस्त्याची झालेली दुरवस्था आणि त्यावर पडलेले गुडघाभर खड्डे बुजवण्यासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज (बुधवार) तिसरा दिवस उजाडला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) निगरगट्ट अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे, आंदोलनकर्ते उमेश म्हेत्रे यांनी उपोषण स्थळी थेट ‘अर्धनग्न’ होऊन प्रशासनाचा तीव्र निषेध केला. ‘Begging’ movement

“यवत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ते दुरुस्तीसाठी निधी नसेल, तर आम्ही त्यांना भीक मागून निधी गोळा करून देऊ,” अशा शब्दांत आंदोलकांनी प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे. सहजपूर ते खामगाव या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना दररोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन नागरिक जायबंदी झाले आहेत. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा, फसवणूक आणि ‘आज काम करतो, उद्या करतो’ ही निव्वळ टोलवाटोलवी ऐकून सामान्य नागरिक आणि वाहनचालक आता पूर्णपणे वैतागून गेले आहेत. ‘Begging’ movement
या टोलवाटोलवीला कंटाळूनच उमेश म्हेत्रे यांनी 25 मे पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने आंदोलन अधिक आक्रमक करण्यात आले. उमेश म्हेत्रे यांनी उपोषण स्थळी कपडे उतरवून अर्धनग्न आंदोलन सुरू केले. दुपारनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली असून, परिसरात ‘भिक मागो आंदोलन’ छेडण्यात येणार आहे. ‘Begging’ movement

दरम्यान, यवत सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) हा रस्ते दुरुस्तीसाठी कंगाल झाला आहे, असे समजून आता गरीब व सामान्य लोकांकडून ५ रुपये, १० रुपये, ५०, १००, २०० ते अगदी ५०० रुपयांपर्यंतचा निधी स्वेच्छेने गोळा केला जाणार आहे. हा जमा झालेला सर्व निधी यवत सार्वजनिक बांधकाम विभागाला ‘दान’ म्हणून दिला जाणार असल्याचे म्हेत्रे यांनी सांगीतले. ‘Begging’ movement







