Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात बनावट नोटांचा कारखाना? 500 रुपयांच्या नोटांचा खच, 4 जणांना ठोकल्या बेड्या

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 27 October 2026, 9:45

पुणे: पुण्यात बनावट नोटा तयार करून त्या जवळ बाळगणाऱ्या टोळीवर विश्रामबाग पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून 500 रुपयांच्या एकूण 1,128 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटांचे दर्शनी मूल्य 5 लाख 64 हजार रुपये आहे. नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा प्रिंटर, संगणक आणि अन्य साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला मिळाली होती. महात्मा फुले मंडई परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांना याबाबत कळवले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला.

14 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास शुक्रवार पेठेतील महात्मा फुले मंडईच्या मागील बाजूस म्हसोबा मंदिरासमोरील रस्त्यावर पोलिसांनी सलमान जैनद्दीन राजे (30, रा. आंबेगाव, केडगाव, दौंड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 500 रुपयांच्या 805 बनावट नोटा मिळाल्या. त्यांचे एकूण मूल्य 4 लाख 2 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 444/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 178, 179, 180, 181 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सलमानची चौकशी केल्यानंतर आणखी 3 जण सहभागी असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी सातारा आणि कोल्हापूर येथे तपास केला.

या कारवाईत सलमान राजे याच्यासह शाफाज फिरोज अन्सारी (30, नालासोपारा), विशाल विलास गलांडे (37, सातारा) आणि अभिजीत रावसाहेब कांबळे (30, शिरोळ, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीच्या कारभाराबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिक्षक-पदवीधरांच्या निकालाची उत्सुकता! राजकीय प्रतिष्ठा पणाला; पक्षीय ताकद, बंडखोरी आणि मतदारांचा कौल ठरणार निर्णायक

Tuesday, 27 October 2026, 10:09

मोबाइल नंबर हवा, Instagram-Snapchat आयडीही मागितला; इंदापुरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला अन्…

Tuesday, 27 October 2026, 10:02

पुण्यातील ‘लेडी डॉन’वर MPDA अंतर्गत कारवाई; वारंवार कारवाईनंतरही अवैध व्यवसाय सुरू ठेवल्याचा आरोप

Tuesday, 27 October 2026, 9:53

पुण्यात बनावट नोटांचा कारखाना? 500 रुपयांच्या नोटांचा खच, 4 जणांना ठोकल्या बेड्या

Tuesday, 27 October 2026, 9:45

‘शिवीगाळ करू नका’ एवढंच म्हटलं अन् वडील संतापले! दोन मुलींना घेतला चावा; पुण्यातील घटना

Tuesday, 27 October 2026, 9:07

विषारी दारू प्रकरणानंतर FDA च्या कारवाईला ब्रेक? कारवाईला स्थगिती देण्यासाठी माजी मंत्र्यांनी केली शिफारस; नेमकं काय घडलं

Tuesday, 27 October 2026, 8:55
Next Post

पुण्यातील 'लेडी डॉन'वर MPDA अंतर्गत कारवाई; वारंवार कारवाईनंतरही अवैध व्यवसाय सुरू ठेवल्याचा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp