पुणे : वारजे माळवाडी परिसरात अवैध हातभट्टी दारू विक्री सुरू ठेवल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी एका महिलेविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. निकिता रणधीर बिरे (रा. विठ्ठलनगर, वारजे माळवाडी) असे या महिलेचे नाव आहे. MPDA कायद्यानुसार तिला स्थानबद्ध करण्यात आले असून, तिची रवानगी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, निकिता बिरे हिच्याविरुद्ध यापूर्वी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अनेकदा कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवायांनंतरही अवैध दारू विक्री सुरू असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. शहरातील बेकायदेशीर धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्देशानुसार वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली निकिता बिरे हिच्याविरोधात MPDA अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 15 ऑक्टोबर 2026 रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी तिला ताब्यात घेऊन कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पुढील कारवाई पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे आणि मनोज साळुंखे यांच्यासह पोलीस अंमलदार विजय खिलारी, अमोल सुतकर, महादेव शिंदे, योगेश वाघ, बालाजी काटे, निखिल तांगडे, शरद पोळ, अमित जाधव, अमित शेलार, सागर कुंभार तसेच महिला पोलीस अंमलदार अंकिता मोहोळ आणि अश्विनी धोत्रे यांनी केली.






