अक्षय टेमगिरे

शिक्रापूर: शिक्रापूर परिसरात सातत्याने वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात शिक्रापूर पोलिसांना मोठे यश आले असून सराईत दुचाकीचोरास अटक करून त्याच्याकडून तब्बल ९५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुण्या अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल होता. फिर्यादी मनोज युवराज टेमगिरे रा. बुरूजवाडी, मलठण रोड, ता. शिरूर यांची हिरो स्प्लेंडर प्लस एमएच १२ एफ व्ही ०६३२ ही मोटारसायकल चोरीस गेली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच परिसरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने रेकॉर्डवरील आरोपी योगेश ज्ञानेश्वर जाधव वय २७, रा. कासारी फाटा, शिक्रापूर, मूळ रा. लोणीधामणी, ता. आंबेगाव याच्यावर गुप्त पाळत ठेवली संशयास्पद हालचाली आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने शिक्रापूर परिसरातील आणखी काही मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
न्यायालयाने मंजूर केलेल्या पोलीस कोठडीदरम्यान झालेल्या तपासात आरोपीकडून चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून. या कारवाईमुळे शिक्रापूर पोलीस ठाण्यातील असे एकूण चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हाडगळे करत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील पोलीस हवालदार जनार्धन शेळके, तुषार पंदारे, संजु जाधव, विकास पाटील, सागर धुमाळ तसेच शिकापुर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार रोहीदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, बापु हडागळे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत यांचे पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.






