उरुळी कांचन : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या वतीने 1 कोटी 21 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 30) करण्यात आले. यामध्ये विकासकामांसाठी 2515 ग्रामविकास, ग्रामनिधी, १५ वा वित्त आयोग, याअंतर्गत रस्ते, रस्ता कोन्क्रीट करणे, बंदिस्त गटार, अशा विविध कामांचे भूमिपूजन व ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन गोरख बबनराव कानकाटे व मान्यवरांच्या यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी सरपंच मंगेश कानकाटे, उपसरपंच अश्विनी कड, माजी उपसरपंच वैशाली सावंत, लिलावती बोधे, ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेधे, बापूसो बोधे, राधिका काकडे, पल्लवी नाझीरकर, ग्रामविकास अधिकारी सतीश कालेकर, सोसायटीचे अध्यक्ष संजय भोसले सामाजिक कार्यकर्ते जयसिंग भोसले, बबनराव कोलते, चंद्रकांत खेडेकर, कचरू कड, विठ्ठल कोलते, प्रवीण शितोळे, दिलीप शितोळे, विशाल कानकाटे, आप्पासाहेब कड, लोकेश कानकाटे, मुकिंदा काकडे, अशोक कारंडे, आप्पा शिंदे, गणेश शितोळे, संतोष शितोळे, अनिकेत कोलते, शुभम कानकाटे, रोहन कानकाटे, संतोष गायकवाड, चेतन कानकाटे, समाधान अवचट, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, “ग्रामस्थांना सोबत घेऊन त्यांच्या मदतीने भविष्यातही अशा प्रकारच्या शाश्वत पायाभूत विकासाच्या अनेक योजना एकत्रितपणे राबविण्याचा मानस आहे. येत्या काळात गावात वृक्षारोपण, ज्येष्ठांना व बालकांना गावात नाना नानी पार्क, स्ट्रीट लाइट पोल यांसारख्या वेगवेगळ्या विकास कामांना निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच मंगेश कानकाटे यांनी सांगितले.”