पुणे: गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी हवामान खात्याने एक सुखद धक्का दिला आहे. 23 मे रोजी नैऋत्य मान्सून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये पोहोचला आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत पावसाचा हा प्रवास अधिक वेगवान होण्यासाठी पूरक वातावरण तयार झाले आहे.
यंदा मान्सून आपल्या नेहमीच्या वेळेपेक्षा आधीच केरळमध्ये पोहोचण्याची चिन्हे आहेत. सहसा 1 जूनला येणारा पाऊस यंदा 26 मे रोजीच केरळमध्ये दाखल होऊ शकतो. सध्या समुद्रात मान्सूनच्या मार्गात कोणतेही चक्रीवादळ नसल्याने मान्सूनचा वेग चांगला आहे.
हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार, मान्सून 7 जूनच्या दरम्यान पुण्यात हजेरी लावू शकतो. दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता आहे.







