मुंबई: अभिनेता रणवीर सिंह आणि ‘डॉन 3’ चित्रपटाचा वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्या ‘डॉन 3’ प्रकल्पातून रणवीर सिंहने अचानक माघार घेतल्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने त्याच्याविरोधात ‘असहकार’ ठराव जाहीर केला आहे.

FWICE च्या म्हणण्यानुसार, रणवीरने शूटिंगपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता चित्रपट सोडला, ज्यामुळे निर्मात्यांचे सुमारे 45 कोटी रुपयांचे नुकसान झाले. यानंतर फेडरेशनने रणवीरला तीनदा स्पष्टीकरणासाठी बोलावले, मात्र तो उपस्थित राहिला नाही.

फेडरेशनचे अध्यक्ष बी.एन. तिवारी यांनी स्पष्ट केले की, रणवीरने वैयक्तिकरित्या चर्चा करेपर्यंत 5000 सभासद आणि 32 संलग्न संघटनांचे तंत्रज्ञ व कर्मचारी त्याच्यासोबत काम करणार नाहीत. या वादामुळे रणवीरच्या आगामी प्रकल्पांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







