Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 April 2026, 14:54

हडपसर, ता. 18 : कमी व्याजदरात जास्त कर्ज देण्याचे आमिष दाखवत एका महिलेकडून तब्बल 28 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने लाटल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली आहे. बनावट वित्तीय संस्थेचे नाव पुढे करून विश्वास संपादन करत आरोपीने नियोजनबद्ध पद्धतीने ही फसवणूक केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी फिरदोस वसीम शेख (वय 28, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहसीन मंझूर आलम पठाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरदोस शेख या आपल्या पती, सासू-सासरे आणि तीन मुलांसह वास्तव्यास आहेत. कुटुंबातील वैद्यकीय अडचणींमुळे त्यांनी 13 जून 2025 रोजी आपल्या 21 तोळे सोन्याचे दागिने हडपसरमधील मॅग फायनान्स येथे गहाण ठेवून सुमारे 11.51 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

दरम्यान, सासऱ्यांची प्रकृती अचानक खालावल्याने अधिक पैशांची गरज निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी मॅग फायनान्सकडे अतिरिक्त कर्जासाठी विचारणा केली. मात्र, तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त कर्ज नाकारले. याच वेळी संबंधित कर्मचारी माधुरी इनामदार यांनी “ओळखीचा व्यक्ती कमी व्याजात अधिक कर्ज मिळवून देईल” असे सांगत मोहसीन मंझूर आलम पठाण याचा संपर्क क्रमांक दिला. विश्वास ठेवून फिर्यादी व त्यांच्या पतीने पठाण याच्याशी संपर्क साधला. त्याने “तुमच्या सोन्यावर अधिक कर्ज देतो, तेही कमी व्याजात” अशी खात्री देत त्यांना भेटीसाठी बोलावले.

 

दरम्यान, घोरपडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत 29 सप्टेंबर 2025 रोजी त्यांची भेट झाली. त्या ठिकाणी पठाण व त्याचा साथीदार मुसेब मुस्तफा मोमीन उपस्थित होते. विश्वास निर्माण करण्यासाठी मोमीन याने आयएमपीएसद्वारे फिर्यादीच्या खात्यात दोन वेळा 5-5 लाख आणि एकदा 3.72 लाख रुपये असे एकूण 13.72 लाख रुपये जमा केले. यानंतर पठाण याने 25 हजार रुपये युपीआयद्वारे परत मागून ते रोख स्वरूपात दिले, ज्यामुळे व्यवहार अधिक विश्वसनीय वाटला.

यानंतर फिर्यादीने मॅग फायनान्सचे सुमारे 12.95 लाख रुपये कर्ज आरटीजीएसद्वारे फेडले आणि गहाण ठेवलेले 21 तोळे सोने सोडवून घेतले. मात्र, याच क्षणी पठाणने “कर्ज प्रक्रियेसाठी आणि तारण ठेवण्यासाठी” सर्व सोन्याचे दागिने आपल्या ताब्यात घेतले. पठाण याने कराड येथील ‘ईवरकृपा मल्टीपर्पज निधी लिमिटेड’ या वित्तीय संस्थेचे नाव सांगून, “तुमचे सोने आमच्या संस्थेत सुरक्षित आहे” असा बनाव केला. त्याने दिलेल्या पावतीवर पुणे व कराड येथील शाखांचे बनावट पत्तेही नमूद करण्यात आले होते.

काही दिवस सर्व काही सुरळीत असल्याचे भासवत पठाण टाळाटाळ करत राहिला. मात्र, सुमारे 20 दिवसांनंतर मॅग फायनान्समधील कर्मचाऱ्याने फोन करून “पठाण हा फसवणूक करणारा आहे, तुमचे सोने परत घ्या” असा इशारा दिला. हे ऐकून फिर्यादी हादरल्या. त्यानंतर त्यांनी पठाणशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याने “सोने सुरक्षित आहे” असे सांगून वेळ मारून नेली. पण नंतर त्याने फोन उचलणेच बंद केले. दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली असता अशी कोणतीही वित्तीय संस्था अस्तित्वात नसल्याचे समोर आले.

आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीनुसार, आरोपी मोहसीन पठाण याने सुमारे 21 तोळे सोने, अंदाजे 28.50 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अपहार करून विश्वासघात केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 316(5) आणि 318(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून खलबतं! बैठकीत मोठा निर्णय, ठोंबरेंना डावलून पुण्यातल्या ‘या’ महिला नेत्याची नियुक्ती…

Wednesday, 17 June 2026, 15:01
Operation Tiger: Rebel MPs were taken to an undisclosed location; Amit Shah made a single phone call, giving the green signal to 'Operation Tiger'—what exactly happened?

Operation Tiger: बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी नेलं, अमित शहांनी एक फोन केला अन् ऑपरेशन टायगरला ग्रिन सिग्नल मिळाला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 17 June 2026, 14:29

बिग बॉस 20 मध्ये असणार आसिम रियाज, शहनाज गिल ते उर्फी जावेद; संभाव्य स्पर्धकांच्या यादीने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Wednesday, 17 June 2026, 13:42

लोणी काळभोर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील 34 प्रकरणांमध्ये सरकारी जमिनींचा गैरवापर; तब्बल 194 कोटींच्या जमिनी सरकारजमा

Wednesday, 17 June 2026, 13:07

लोणावळ्यातील बंगल्यावर पोलिसांची अचानक धाड; मालकासह 18 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Wednesday, 17 June 2026, 13:03

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा कापलेला पाय मावशीच्या दाराला टांगला; घटनेने परिसरात खळबळ

Wednesday, 17 June 2026, 12:05
Next Post
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

Uruli Kanchan News : ‘तू मला खूप आवडतोस’ म्हणत अल्पवयीन मुलाचा विनयभंग ; पोलीस ठाण्यात ग्राफिक डिझायनरवर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.