Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे महिला डॉक्टरच्या घरातून सुमारे 10 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 30 June 2026, 17:29

उरुळी कांचन, (पुणे) : घरच्या कपाटातील कपडे आणि इतर वस्तू जशाच्या तशा सुव्यवस्थित… ना कुलूप तुटलेले, ना कपाट उचकटलेले… तरीही कपाटाच्या लॉकरमधील तब्बल चालू बाजारभावाप्रमाणे तब्बल 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौक परिसरातील एका डॉक्टरांच्या घरी 12 जून ते 27 जून दरम्यान ही घटना घडली.

याबाबत डॉ. सुहासिनी विजय जाधव (वय-30, रा. हरीजीवन हॉस्पीटलच्या पाठीमागे तळवडी चौक उरुळी कांचन) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुहासिनी या ‘तेजम होमिओपॅथिक क्लिनिक अँड हीलिंग सेंटर’ चालवतात. त्या पती विजय जाधव, सासू कौशल्या, सासरे आनंदराव, दीर शशांक आणि जाऊबाई नीलम जाधव यांच्यासह एकत्रित कुटुंबात राहतात. 12 जून 2026 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास डॉ. सुहासिनी यांनी स्वतःचे आणि पतीचे दागिने नेहमीप्रमाणे घरातील कपाटात सुरक्षित ठेवले होते.

 

27 जून रोजी सकाळी एका नातेवाईकाच्या घरी कार्यक्रमाला जाण्यासाठी त्यांनी कपाट उघडले असता लॉकरमधील एकही दागिना जागेवर आढळून आला नाही. 12 जून ते 27 जून या 15 दिवसांच्या काळात घरातील कपाट आणि कपडे अत्यंत सुव्यवस्थित असल्याने घरात चोरी झाली आहे, याचा डॉ. सुहासिनी यांना संशयही आला नाही. घरामध्ये सर्वत्र शोध घेतला असता आढळून आले नाहीत.

दरम्यान, चोरी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये 20 ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट, 1 तोळे वजनाची सोन्याची पिळ्याची अंगठी, 2 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, सोन्याचा चंद्रहार, वेल असे 10 लाख रुपयांचे साडेसात तोळे सोन्याचे दागिने चोरी झाले. याबाबत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पण कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार सरींचा इशारा!

Sunday, 2 August 2026, 7:31

रविवारचा राजयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा;प्रत्येक कामात मिळणार यश

Sunday, 2 August 2026, 7:14

बारामतीत बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश! सरकारी नोकरीचं आमिष दाखवून तब्बल 117 जणांना गंडा,खोटी नियुक्तीपत्रे वाटली अन्…..

Sunday, 2 August 2026, 0:05

तब्बल 5 वर्षांनंतर कार स्फ़ोटक प्रकरणात मोठी कारवाई! सचिन वाझे, प्रदीप शर्मांवर अखेर आरोप निश्चित

Saturday, 1 August 2026, 22:20

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा पळसनाथ विद्यालयात सन्मान

Saturday, 1 August 2026, 21:11

उरुळी कांचनमध्ये नवदिशा विकास प्रतिष्ठानतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी!

Saturday, 1 August 2026, 21:03
Next Post

परवान्याशिवाय भरधाव दुचाकी चालवणे जीवावर बेतले; आळंदी म्हातोबाची येथील अपघातात १९ वर्षीय तरुणाच्या मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.