उरुळी कांचन, : आपल्या शाहिरी, साहित्य आणि विचारांच्या माध्यमातून शोषित, वंचित व कष्टकरी समाजाला क्रांतीची नवी दिशा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उरुळी कांचन येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. ‘नवदिशा विकास प्रतिष्ठान’ तसेच समाजसेवक किशोर लोणारी आणि सारिका लोणारी यांच्या विशेष पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उरुळी कांचन क्षेत्रातील राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच संतोष कांचन आणि माजी उपसरपंच युवराज कांचन यांच्यासह अन्य वक्त्यांनी अण्णाभाऊंच्या संघर्षमय जीवनावर व त्यांच्या अजरामर साहित्यावर सविस्तर प्रकाश टाकला.

दरम्यान, अण्णाभाऊंनी शिक्षण, साहित्य आणि आपल्या अजरामर लेखणीच्या माध्यमातून श्रमिक व कष्टकरी समाजाच्या अन्यायाविरुद्ध जो आवाज उठवला, त्याचे स्मरण वक्त्यांनी आपल्या भाषणातून करून दिले.
यावेळी ज्येष्ठ नेते के.डी. कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, संतोष कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, यशवंतचे संचालक संतोष कांचन, उद्योजक अभिषेक कांचन, प्रसाद कांचन, अलंकार कांचन, मोनू बडेकर, दत्तात्रय लोणारी, गणेश लोणारी, गौरव लोणारी, आदी मान्यवर उपस्थित होते.






