Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परवान्याशिवाय भरधाव दुचाकी चालवणे जीवावर बेतले; आळंदी म्हातोबाची येथील अपघातात १९ वर्षीय तरुणाच्या मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 30 June 2026, 17:34

लोणी काळभोर, ता. ३० : परवान्याशिवाय भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवताना समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या १९ वर्षीय तरुणाविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी तपासाअंती गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे वाहतूक नियमांचे पालन आणि परवान्याशिवाय वाहन चालविण्याच्या वाढत्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

राकेश राहुल गायकवाड (वय १९, रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश गायकवाड हा ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्याच्या ताब्यातील स्प्लेंडर होंडा (एमएच-१२-एक्सपी-१८४५) या दुचाकीवरून म्हातोबाची आळंदीहून कुंजीरवाडीच्या दिशेने जात होता.

आळंदी म्हातोबाची येथील स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासमोर एका पॅनजो टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याने भरधाव वेगाने, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे दुचाकी चालवली. याचवेळी समोरून येणाऱ्या महिंद्रा सुप्रो टेम्पो (एमएच-१२-एसएफ-८६२५) ला त्याची दुचाकी जोरात धडकली. या भीषण अपघातात टेम्पोचे नुकसान झाले, तर राकेश गायकवाड याचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला.

 

या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात यापूर्वी अकस्मात मृत्यू नोंद (एडी क्र. ३१/२०२६) दाखल करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण कांतीलाल जाधव यांनी केलेल्या सखोल तपासात मृत तरुणाकडे कोणताही वैध वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे तसेच त्याच्या निष्काळजी वाहनचालकामुळेच अपघात घडल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मृत राकेश गायकवाड याच्याविरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पण कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार सरींचा इशारा!

Sunday, 2 August 2026, 7:31

रविवारचा राजयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा;प्रत्येक कामात मिळणार यश

Sunday, 2 August 2026, 7:14

बारामतीत बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश! सरकारी नोकरीचं आमिष दाखवून तब्बल 117 जणांना गंडा,खोटी नियुक्तीपत्रे वाटली अन्…..

Sunday, 2 August 2026, 0:05

तब्बल 5 वर्षांनंतर कार स्फ़ोटक प्रकरणात मोठी कारवाई! सचिन वाझे, प्रदीप शर्मांवर अखेर आरोप निश्चित

Saturday, 1 August 2026, 22:20

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा पळसनाथ विद्यालयात सन्मान

Saturday, 1 August 2026, 21:11

उरुळी कांचनमध्ये नवदिशा विकास प्रतिष्ठानतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी!

Saturday, 1 August 2026, 21:03
Next Post

उरुळी कांचन येथे नियंत्रण सुटलेला आयशर टेम्पो डिव्हायडर तोडून तीन वाहनांवर आदळला; टेम्पो चालकावर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.