Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे नियंत्रण सुटलेला आयशर टेम्पो डिव्हायडर तोडून तीन वाहनांवर आदळला; टेम्पो चालकावर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 30 June 2026, 17:49

उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून रस्ता दुभाजक (डिव्हायडर) तोडून थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांना जोरात धडक दिली. या अपघातात महामार्गाच्या कडेला असलेल्या एका ऑफिससमोरील दोन बुलेट आणि एका कारचे नुकसान झाले आहे. सोमवारी (ता. 29) रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत दत्ता कांबळे (वय-24, रा. मुबारकपूर, ता. निलंगा, जि. लातूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याबाबत स्वप्निल संभाजी बोधे (वय-27, व्यवसाय – खडी क्रशर सप्लायर रा. बोधेवस्ती, कोरेगाव मुळ (ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल बोधे यांचे उरुळी कांचन येथील चौधरी माथा परिसरात पुणे-सोलापूर रोडच्या कडेला ऑफिस असून खडी क्रशर सप्लायरचा व्यवसाय करतात. सोमवारी (ता. 29) रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास स्वप्निल बोधे यांनी त्यांची महिंद्रा कंपनीची ‘निओ स्पार्टे’ कार आणि रॉयल एनफिल्ड ‘बुलेट’ऑफिससमोर पार्क केली आणि ते ऑफिसमध्ये गेले होते.

 

सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे लेनवरून पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणारा एक भरधाव आयशर टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने थेट डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या लेनवर आला आणि बोधे यांच्या ऑफिससमोर उभ्या असलेल्या वाहनांवर आदळला. यामध्ये बोधे यांच्या महिंद्रा निओ कारच्या पुढील बाजूचे, तसेच उजव्या व डाव्या दोन्ही बाजूंचे नुकसान झाले. तसेच त्यांच्या बुलेट गाडीचे इंजिन, हँडल आणि समोरील बंपर पूर्णपणे तुटले आहे.

दरम्यान, याशिवाय, शेजारील गॅरेजमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराची रॉयल एनफिल्ड बुलेटचे देखील नुकसान झाले आहे. अपघातानंतर धडक देणाऱ्या आयशर टेम्पोचा चालक श्रीकांत कांबळे याला पकडले. याप्रकरणी स्वप्निल बोधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पोचालकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार रमेश भोसले करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08

खासगी गाड्यांवर ‘पोलीस’ लिहिलंय का? तर मग बसणार मोठा दणका; वाहतूक विभागाचे कठोर कारवाईचे आदेश

Monday, 3 August 2026, 19:28

कोरेगाव मूळ येथे येथील मुळा-मुठा बंधाऱ्यावरून बिवरीतील एकजण गेला वाहून; 15 दिवसांपूर्वी ‘पुणे प्राईम न्यूज’कडून धोक्याचा व्हिडिओ प्रसारित, तर आज दुर्घटना, प्रशासनाचा अद्याप पत्ता नाही..

Monday, 3 August 2026, 19:25

कोरेगाव मूळमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..

Monday, 3 August 2026, 18:42

महिला PMPMLमध्ये चढली, प्रवाशांची कोंबाकोंब अन् गर्दीचा फायदा घेत घडलं भयंकर; सरळ पोलीस स्टेशन गाठलं अन्…

Monday, 3 August 2026, 18:06

कदमवाकवस्तीत घरफोडी! उघड्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला; तब्बल ८ लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

Monday, 3 August 2026, 17:30
Next Post

Daund Crime : गुऱ्हाळावरील कामगाराचा जेसीबीखाली मृत्यू; अपघात लपवण्यासाठी मृतदेह रस्त्यावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, चौघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.