Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime : गुऱ्हाळावरील कामगाराचा जेसीबीखाली मृत्यू; अपघात लपवण्यासाठी मृतदेह रस्त्यावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, चौघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 30 June 2026, 17:54

यवत, ता. ३० : गाडामोडी (ता. दौंड) येथील गुऱ्हाळावर काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील २३ वर्षीय मजुराचा जेसीबीखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर तो अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीत टाकून वाघोली-राहू रोडवर फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी जेसीबी चालक, मालक आणि अन्य चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव रामू शंभू पासी (वय २३, रा. कोला, जि. सीतापूर, उत्तर प्रदेश) असे असून, तो एप्रिल २०२६ पासून गाडामोडी येथील गुऱ्हाळावर मजूर म्हणून काम करत होता. याप्रकरणी त्याचा भाऊ राजू शंभू पासी (वय २१) याने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी ठेकेदार तमरेज फरिदी यांनी फोन करून रामू बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी काही दिवस वाट पाहिली. मात्र तो घरी न परतल्याने राजू पासी हा उत्तर प्रदेशातून दौंड येथे आला आणि विविध ठिकाणी भावाचा शोध घेतला. अखेर २९ जून रोजी गुऱ्हाळावर चौकशी केली असता संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला.

१९ जूनच्या मध्यरात्री सुमारे १.३० वाजता गुऱ्हाळावर जेसीबीचे काम सुरू असताना चालक आलम याच्या निष्काळजीपणामुळे झोपलेल्या रामू पासीवर जेसीबीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर जेसीबी मालक अविनाश बाळासो यादव याने ठेकेदाराला धमकी देत, “ही बाब कोणालाही सांगू नका, अन्यथा जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर अविनाश यादव, गणेश हरिभाऊ जगताप, तसेच कल्लू आणि प्रधान इस्तकार यांनी संगनमत करून रामूचा मृतदेह कारच्या डिकीत टाकला.

 

पहाटेच्या सुमारास हे सर्वजण परत आल्यानंतर त्यांनी मृतदेह वाघोली-राहू रोडवर टाकून अपघाताचा बनाव केल्याची कबुली दिली. या संपूर्ण प्रकारामुळे अपघात लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २३८ आणि ३(५) अंतर्गत जेसीबी चालक आलम, जेसीबी मालक अविनाश यादव, गणेश जगताप तसेच कल्लू आणि प्रधान इस्तकार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे गुऱ्हाळावरील मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अपघातानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करण्याच्या आरोपामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. यवत पोलीस या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कदमवाकवस्ती येथील नवसाला पावणाऱ्या गणरायाचे दिमाखात आगमन! छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सवात यंदाही विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांची मेजवानी

Monday, 14 September 2026, 16:56

वारकरी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सलग ३ दिवस दर्शनासाठी पूर्णपणे बंद

Monday, 14 September 2026, 16:55

बायकोची हत्या, मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं अन् आता आरोपी पतीचाही मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 14 September 2026, 16:48

सोन्या-चांदीचे दर पुन्हा घसरले! गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या आजचा रेट

Monday, 14 September 2026, 16:20

पर्यटकांसाठी मोठी बातमी! ऐतिहासिक किल्ले पुरंदरवर २२ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान पूर्णपणे प्रवेशबंदी

Monday, 14 September 2026, 15:56

पुण्यात एसटी महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर! कोकणासाठी २६० बसेस सोडल्या, पण मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राच्या नियमित गाड्याच गायब

Monday, 14 September 2026, 15:07
Next Post

बीएलओ ड्युटीमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद पडणार? विद्यार्थ्यांना शिकवणार कोण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp