Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वारकरी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सलग ३ दिवस दर्शनासाठी पूर्णपणे बंद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 14 September 2026, 16:55

पंढरपूर : वारकरी आणि विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर २३ ते २५ सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात विठ्ठलाच्या पुरातन मूर्तीवर पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली संवर्धनासाठी विशेष लेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे.

या तीन दिवसांत भाविकांना श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मुखदर्शन तसेच पदस्पर्श दर्शन घेता येणार नाही. मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. लेपनाचे काम पूर्ण होईपर्यंत मंदिरात दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे.

विठ्ठल मूर्तीवरील लेपनाची प्रक्रिया गेल्या काही काळापासून रखडली होती. ही प्रक्रिया जून महिन्यातच होणे अपेक्षित होते. मात्र, मूर्तीवर रासायनिक लेपन करावे की आयुर्वेदिक लेपन करावे, यावरून मतभेद निर्माण झाले होते. या प्रकरणानंतर न्यायालयीन प्रक्रियाही झाली.

अखेर कोल्हापूर खंडपीठाच्या आदेशानुसार पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने आणि देखरेखीखाली विठ्ठल मूर्तीवर रासायनिक संवर्धन लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने बैठक घेऊन २३ ते २५ सप्टेंबर या तारखा निश्चित केल्या आहेत.

 

पुरातन मूर्तीचे संवर्धन करताना तिचे मूळ स्वरूप आणि सुरक्षितता कायम ठेवण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. लेपन प्रक्रियेमुळे मूर्तीचे संरक्षण होण्यास तसेच तिचे आयुष्य वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, या तीन दिवसांच्या कालावधीत पंढरपूरला दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी आणि भाविकांनी नियोजनात बदल करावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित दर्शन व्यवस्था पूर्ववत होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राजकारणात भूकंप! 17 बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 14 September 2026, 17:41

“ही माझी शेवटची भेट असू शकते!” उपोषणाच्या १७ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

Monday, 14 September 2026, 17:32

कदमवाकवस्ती येथील नवसाला पावणाऱ्या गणरायाचे दिमाखात आगमन! छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सवात यंदाही विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांची मेजवानी

Monday, 14 September 2026, 16:56

वारकरी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सलग ३ दिवस दर्शनासाठी पूर्णपणे बंद

Monday, 14 September 2026, 16:55

बायकोची हत्या, मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं अन् आता आरोपी पतीचाही मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 14 September 2026, 16:48

सोन्या-चांदीचे दर पुन्हा घसरले! गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या आजचा रेट

Monday, 14 September 2026, 16:20
Next Post

कदमवाकवस्ती येथील नवसाला पावणाऱ्या गणरायाचे दिमाखात आगमन! छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सवात यंदाही विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांची मेजवानी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp