Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्ती येथील नवसाला पावणाऱ्या गणरायाचे दिमाखात आगमन! छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सवात यंदाही विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांची मेजवानी

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 14 September 2026, 16:56

लोणी काळभोर, ता. 14 : नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची श्रद्धा असलेल्या कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील श्रीमंत छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळ ट्रस्टच्या गणरायाचे सोमवारी (ता. 14) मोठ्या उत्साहात आणि दिमाखात आगमन झाले. मागील 11 वर्षांपासून या मंडळाकडून सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असून, धार्मिक उत्सवासोबत सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांची परंपराही मंडळाने जपली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या कदमवाकवस्तीतील संभाजीनगर परिसरात 2015 मध्ये ग्रामपंचायत सदस्य अविनाश ऊर्फ पप्पू बडदे यांच्या पुढाकारातून मंडळाची स्थापना झाली. स्थापनेपासूनच मंडळाने गणेशोत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड दिली आहे. रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, नवमतदार नोंदणी शिबिर यांसह विविध उपक्रम राबविण्यात येतात.

‘नवसाचा गणपती’ म्हणून मिळाली ओळख

गेल्या 11 वर्षांत भाविकांना आलेल्या अनुभवांमुळे या गणरायाबद्दलची श्रद्धा अधिक दृढ झाली आहे. त्यामुळे मंडळाच्या गणपतीला ‘नवसाचा गणपती’ अशी ओळख मिळाली असून, भाविकांकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात देणगी व चांदीच्या वस्तू अर्पण केल्या जातात. यंदाही गणरायाच्या चरणी भाविकांनी भरभरून दान अर्पण केले आहे. साधना बँकेचे संचालक बाळासाहेब कोळपे यांनी 7 लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट, केतन साठे यांनी 57 हजार रुपये किमतीचे चांदीचे सोंडमुख, तर उत्सवप्रमुख ऋषिकेश काळभोर यांनी 71 हजार रुपये किमतीचा चांदीचा हात अर्पण केला आहे.

गेल्या 11 वर्षांत गणरायाला तब्बल 16 ते 17 लाख रुपये किमतीची चांदी प्राप्त झाली असून, यामध्ये चांदीचा मूषक तसेच अन्य वस्तूंचाही समावेश आहे. भाविकांकडून अद्यापही चांदीच्या वस्तू व देणगी अर्पण करण्याचा सिलसिला सुरू असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 
महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ

गणेशोत्सवाच्या काळात महिलांसाठी पैठणी, मंगळागौरी आणि ‘होम मिनिस्टर’सारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व बुद्धिबळ स्पर्धा घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. दरवर्षी पारंपरिक क्रीडा प्रकारांचाही समावेश करण्यात येतो. यंदाच्या उत्सवाच्या अध्यक्षपदी यश साकोरे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत मरगुत्ती, तर उत्सवप्रमुखपदी बाबाराजे भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

यंदाच्या गणेशोत्सवात सोमवारी पारंपरिक आगमन मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात झाली. मंगळवारी (ता. 15) उद्घाटन व बालमेळावा, बुधवारी (ता. 16) मंगळागौरी स्पर्धा, गुरुवारी (ता. 17) चित्रकला स्पर्धा, शुक्रवारी (ता. 18) ‘महाराष्ट्राची लोकधारा’, शनिवारी (ता. 19) प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान, रविवारी (ता. 20) महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ आणि सोमवारी (ता. 21) डान्स शो आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता. 22) लहान व मोठ्या गटांसाठी डान्स स्पर्धा होणार असून, बुधवारी (ता. 23) सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा दरवर्षी तीन ते चार हजार भाविक लाभ घेतात. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर परिसरातील रेनबो स्कूलशेजारी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष यश साकोरे यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राजकारणात भूकंप! 17 बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 14 September 2026, 17:41

“ही माझी शेवटची भेट असू शकते!” उपोषणाच्या १७ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

Monday, 14 September 2026, 17:32

कदमवाकवस्ती येथील नवसाला पावणाऱ्या गणरायाचे दिमाखात आगमन! छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सवात यंदाही विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांची मेजवानी

Monday, 14 September 2026, 16:56

वारकरी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सलग ३ दिवस दर्शनासाठी पूर्णपणे बंद

Monday, 14 September 2026, 16:55

बायकोची हत्या, मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं अन् आता आरोपी पतीचाही मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 14 September 2026, 16:48

सोन्या-चांदीचे दर पुन्हा घसरले! गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या आजचा रेट

Monday, 14 September 2026, 16:20
Next Post

“ही माझी शेवटची भेट असू शकते!” उपोषणाच्या १७ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp