अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : करडे-रांजणगाव गणपती दरम्यान असलेल्या अष्टविनायक महामार्गाच्या कडेला पडीक जमिनीत रात्रीच्या वेळेस भंगारामधील अनावश्यक कचरा जाळला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या कचऱ्यामधुन निघणाऱ्या धुरामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
करडे येथुन रांजणगाव गणपती येथे अष्टविनायक महामार्ग जातो. त्या महामार्गाच्या कडेला (दि. 23) रोजी रात्री नऊच्या सुमारास भंगारामधील (क्रॅप) अनावश्यक कचरा जाळण्यात आला. यावेळी मोठया प्रमाणात धुराचे लोट आजूबाजूच्या परीसरात दिसत होते. या धुरामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस कचरा जाळणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
करडे एमआयडीसीमुळे बकालपणा वाढण्याची शक्यता…
रांजणगाव येथे आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असुन करडे येथे रांजणगाव औद्योगिक वसाहतीचा टप्पा क्रं. 3 चे काम सुरु आहे. या औद्योगिक वसाहतीत स्थानिक लोकांचे वेगवेगळे भंगाराचे (क्रॅप) ठेके आहेत. याच लोकांकडून रात्रीच्या वेळेस कचरा जाळण्याचे काम करत आहेत.
दरम्यान, करडे येथील ग्रामसेवक एल. डी. जगदाळे यांना संपर्क साधला असता, ते म्हणाले रात्रीच्या वेळेस कचरा जाळला जात असल्याबाबत मला काहीही कल्पना नाही. याबाबत माहिती घेऊन सांगतो.