Monday, August 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश थोरात बिनविरोध; प्रलंबित प्रश्नांसाठी ‘आवाज बुलंद’ करण्याचा निर्धार!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 10 August 2026, 17:56

पुणे, ता. १० : पुणे जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अल्प बचत भवन, पुणे येथे झालेल्या निवड व पदाधिकारी पुनर्बांधणी बैठकीत उपस्थित कर्मचाऱ्यांच्या एकमताने थोरात यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पदभार स्वीकारताच त्यांनी भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेची अध्यक्ष निवड व पदाधिकारी पुनर्बांधणी बैठक ८ ऑगस्ट २०२६ रोजी अल्प बचत भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्हा संघटनेचे माजी पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय पिसाळ, सातारा भूमी अभिलेख संघटनेचे अध्यक्ष राहुल भोसले, पुणे जिल्हा भूमी अभिलेख संघटनेचे माजी अध्यक्ष सदानंद मोरडे, तांत्रिक संघटना भूमी अभिलेख पुणे विभागाचे अध्यक्ष सूरज रामटेके, पुणे जिल्हा वर्ग चार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बनकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थित कर्मचाऱ्यांच्या संमतीने गणेश थोरात यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर थोरात यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला.

वेतनश्रेणीपासून मोजणी सॉफ्टवेअरच्या अडचणींपर्यंत प्रश्नांचा पाढा

भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित असल्याकडे थोरात यांनी लक्ष वेधले. यामध्ये सुधारित वेतनश्रेणीची अंमलबजावणी, वेतनातून दोन हजार रुपये प्रवास भत्ता, दर तीन वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या, चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या विभागीय चौकशीची प्रलंबित प्रकरणे आणि वरिष्ठ कार्यालयात विनाकारण रखडलेली वैद्यकीय बिले यांचा समावेश आहे.

 

तसेच मोजणी प्रकरणांमध्ये अर्जदार व लगतदारांना नोटिसा पाठविण्यासाठी लागणाऱ्या पोस्ट पाकिटे व तिकिटांचा खर्च, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर टाकण्यात येणारा अतिरिक्त कामाचा बोजा, एकाच दिवशी दोन ते तीन मोजणी प्रकरणे देण्याचा प्रकार आणि मोजणी सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी यावरही संघटना आवाज उठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘मनमानी कारभाराविरोधात महसूल मंत्र्यांकडे धाव घेणार’

भूमी अभिलेख प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराबाबतही थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अलीकडच्या काळात भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या कथित नाहक त्रासाबाबत महसूल मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१५ वर्षांचा अनुभव संघटनेच्या कामी लावणार

गणेश थोरात हे २००९ च्या बॅचचे कर्मचारी असून मागील १५ वर्षांपासून पुणे जिल्ह्यात कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण व जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर संघटना अधिक मजबूत आणि व्यापक करण्याचा निर्धार थोरात यांनी व्यक्त केला. कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणी व समस्या लेखी स्वरूपात संघटनेकडे मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

थोरात यांच्या बिनविरोध निवडीमुळे बैठकीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. आगामी काळात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी किती प्रभावीपणे वाचा फोडली जाते, याकडे आता कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

WagonR मधून आले, जबरदस्तीने गाडीत बसवत अपहरण, दारू पाजली अन्… पुण्यातील व्यवस्थापकाच्या अपहरणात धक्कादायक खुलासे

Monday, 10 August 2026, 18:14

पुणे जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश थोरात बिनविरोध; प्रलंबित प्रश्नांसाठी ‘आवाज बुलंद’ करण्याचा निर्धार!

Monday, 10 August 2026, 17:56

निवासी वसतिगृहात ६ विद्यार्थिंनींसोबत घडलं भयंकर! रात्रीच्या अंधारात सापाने घेत बळी; उपचारादरम्यान तिघींचा मृत्यू

Monday, 10 August 2026, 17:26

Loni Kalbhor News: ‘आखाड पार्टी’त तडीपार गुंडाला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 10 August 2026, 16:54

लोणी काळभोर येथे हातात कोयता घेऊन दहशत माजविणारा तडीपार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात!

Monday, 10 August 2026, 16:44

जिल्हा कामगार उपायुक्ताला १ कोटी ७९ लाखांच्या साहित्य घोटाळ्यात अटक; कामगारांच्या हक्काचे साहित्य थेट खासगी लोकांना विकले..

Monday, 10 August 2026, 16:35
Next Post

WagonR मधून आले, जबरदस्तीने गाडीत बसवत अपहरण, दारू पाजली अन्... पुण्यातील व्यवस्थापकाच्या अपहरणात धक्कादायक खुलासे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.