Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुराच्या रौद्ररूपाने हिरावला जीव! मुळा-मुठा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह अखेर दौंड तालुक्यात सापडला…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 5 August 2026, 10:32

उरुळी कांचन, (पुणे) : मुळा-मुठा नदीला आलेल्या भीषण पुरामुळे कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून वाहून गेलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह अखेर तीन दिवसानंतर सापडला. बुधवारी (ता. 05) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मिरवडी (ता. दौंड) येथील एका शेतामध्ये पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतर हा मृतदेह अडकलेल्या स्थितीत मिळून आला. सोमवारी (ता. 03) रोजी सायंकाळी 6 ते सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर साहेबराव गोते (वय-65, रा. बिवरी, ता. हवेली) असे पूरप्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी मुळा-मुठा नदीच्या पात्रातील पाणी पातळी वाढल्याने कोरेगाव मूळ बंधाऱ्यावरून वेगाने सुमारे एक फूट पाणी वाहत होते.

पाण्याचा वेग प्रचंड असतानाही गंगाधर गोते यांनी आपली दुचाकी (बाईक) पुराच्या प्रवाहातून पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने मध्यभागी त्यांचा तोल गेला आणि ते दुचाकीसह पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले. गोते हे दुचाकीसह वाहून जात असतानाचा व्हिडिओ सर्वप्रथम पुणे प्राईम न्यूजने इंस्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

घटना घडल्यापासूनच स्थानिक नागरिक, उरुळी कांचन पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने नदीपात्रात सलग तीन दिवस शोधकार्य सुरू होते. मात्र, पाण्याचा प्रचंड वेग आणि वाढत्या पाणी पातळीमुळे शोधमोहिमेत मोठे अडथळे येत होते. अखेर बुधवारी सकाळी पाण्याचा प्रवाह काहीसा कमी झाल्यानंतर दौंड तालुक्यातील मिरवडी गावच्या हद्दीतील एका शेतात गोते यांचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला.

 

दरम्यान, शेतात मृतदेह दिसताच स्थानिकांनी तातडीने बिवरी येथील दत्तात्रय उत्तम गोते आणि पोलीस पाटील सागर गोते यांना फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

आपटीतील 25 वर्षीय विवाहिता बेपत्ता ; 11 महिन्यांच्या बाळामुळे परिसरात हळहळ, शिक्रापूर पोलिसांत तक्रार दाखल..

Wednesday, 5 August 2026, 14:39

राष्ट्रवादीला मिळाल्या नवीन महिला प्रदेशाध्यक्षा; रुपाली चाकणकरांचा पत्ता कट, कोणाला मिळाली मोठी जबाबदारी?

Wednesday, 5 August 2026, 14:23

18 वर्षे नरकयातना, तब्बल 10 वेळा जबरदस्तीने गर्भपात; हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ

Wednesday, 5 August 2026, 13:39

परतीच्या संत तुकाराम महाराज पालखीचा आज कुंजीरवाडीत मुक्काम; शासनाचा निधी नाही; ग्रामस्थांनी जमवली लोकवर्गणी; परतीच्या पालखीलाही निधी देण्यासाठी जिल्हा परिषदेत पाठपुरावा करणार – सभापती युवराज काकडे

Wednesday, 5 August 2026, 13:11

4 वर्षांचं प्रेम, गुपचूप कोर्ट मॅरेज अन् बापाचा संताप! प्रतिष्ठा जपण्यासाठी बापाने घेतला 24 वर्षीय मुलीचा जीव

Wednesday, 5 August 2026, 12:34

“मोदी आणि अमित शाह गुंगा गुड्डा झालेत” संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 12:17
Next Post

पाणी नाही, सुविधा नाही... मग कर कशासाठी? भोरच्या स्वप्नलोक सोसायटीतील नागरिकांचा संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.