Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवणमध्ये फायनान्स कंपनीला साडेपाच लाखांचा चुना; हफ्ते गोळा केले मात्र संस्थेत भरलेच नाहीत, 66 महिला बचत गटांची वसुली घेऊन एजंट पसार..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 6 June 2026, 16:23

भिगवण, (पुणे) : महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करणाऱ्या भिगवण येथील एका खाजगी फायनान्स कंपनीत वसुली अधिकाऱ्यानेच (एजंट) लाखो रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात फलटण येथील एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेंद्र चंद्रकांत घोलप (रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे. याबाबत सोमनाथ बाबू भोंडवे (वय 34, रा. भिगवण, ता. इंदापूर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 66 महिलांकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण 5 लाख 69 हजार 508 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ भोंडवे हे भिगवण येथील ‘सी कॉमर्स मार्केट सिव्हीसेसे प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनी ग्रामीण भागातील गरजू महिलांना बचत गटांमार्फत व्यवसायासाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांचे कर्ज 1.3 टक्के व्याजाने वाटप करण्याचे काम करते.

 

या संस्थेने कर्ज घेतलेल्या महिलांकडून साप्ताहिक अथवा मासिक हफ्त्यांची वसुली करण्यासाठी एजंट नेमले होते. 14 मे 2025 रोजी कंपनीने सुरेंद्र घोलप (रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा) याला भिगवण शाखेत वसुली अधिकारी म्हणून कामावर ठेवले होते. त्याच्यावर भिगवण, कर्जत, राशीन, करमाळा, राजेगाव, कुसेगाव आणि बारामती परिसरातील 66 कर्जदार महिलांकडून कर्जाची मुद्दल व व्याज गोळा करून ते संस्थेच्या खात्यात जमा करण्याची मुख्य जबाबदारी होती.

सुरेंद्र घोलप याने सुरुवातीला नीट काम केले. मात्र, दि. 14 मे ते 30 ऑक्टोबर 2025 या कालावधीत त्याने 66 महिलांकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण 5 लाख 69 हजार 508 रुपयांची वसुली केली. परंतु, ही मोठी रक्कम कंपनीच्या बँक खात्यात भरलीच नाही. आरोपी सुरेंद्र घोलप हा कंपनीला कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि कसलाही आर्थिक हिशोब न देता अचानक कामावरून पळून गेला. कंपनीच्या व्यवस्थापनाने त्याच्या मोबाईल नंबरवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वतःचा फोन कायमचा बंद करून ठेवला होता.

संशय आल्याने शाखा व्यवस्थापक सोमनाथ भोंडवे यांनी 25 नोव्हेंबर 2025 रोजी कंपनीचे जुने रेकॉर्ड तपासले, तेव्हा अनेक महिलांचे हप्ते थकल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ कर्जदार महिलांशी थेट संपर्क साधला, तेव्हा सर्व महिलांनी एजंट सुरेंद्र घोलप याच्याकडे वेळेवर पैसे भरल्याचे सांगितले आणि त्यांच्याकडे पावतीही होती.

दरम्यान, कंपनीच्या वतीने शाखा व्यवस्थापक सोमनाथ भोंडवे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून भिगवण पोलीस ठाण्यात आरोपी सुरेंद्र चंद्रकांत घोलप (रा. फलटण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार महेश उगले पुढील तपास करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“श्रीमंतीचे खोटे आमिष, लग्नानंतर पैशांचा तगादा अन् मारवाडी साडीची सक्ती; लोणी काळभोरच्या विवाहितेचा अमानुष छळ, पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा!”

Friday, 31 July 2026, 15:33

पुणे विद्यापीठाचा कर्मचारीच निघाला मास्टरमाइंड! ७० हजार घेऊन दिली ‘बी.कॉम.’ची बोगस डिग्री; असं फुटलं घोटाळ्याचं बिंग

Friday, 31 July 2026, 15:27

सोन्याने पुन्हा घेतली उसळी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले दर; चांदी 2.20 लाखांच्या पार

Friday, 31 July 2026, 15:03

‘केवळ खासगी आस्थापनांनाच टार्गेट करणार का?” तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयातील कॅन्टीनच्या स्वच्छतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

Friday, 31 July 2026, 14:57

पुण्याच्या पर्यावरणाबाबत धोक्याची घंटा! प्रदूषणाने पुणेकर हैराण, महापालिकेच्या सर्वेक्षणातून चिंताजनक वास्तव आलं समोर

Friday, 31 July 2026, 14:38

साखरपुड्याच्या आनंदात पार्थ पवारांना अश्रू अनावर; वडिलांच्या आठवणीने जीव झाला व्याकुळ, ‘तो’ भावनिक क्षण कॅमेरात कैद

Friday, 31 July 2026, 14:27
Next Post

थेऊर, नायगाव व हिंगणगाव कृषी फिडरवरील गावांना पुन्हा दिवसा वीजपुरवठा सुरू करा; सभापती युवराज काकडे यांची महावितरणकडे मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.