युनूस तांबोळी
शिरूर : वंचीत समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकाने केलेला प्रयत्न आणि अ ब क ड ई चा श्री गणेशा गिरवणारा विद्यार्थी यांच्यातील अतुट नाते निर्माण करून भविष्यातील पिढी घडविण्यासाठी झालेला प्रयत्न ‘फिटमफाट’ या लघुपटात दाखविण्यात आला आहे. या लघुपटाचे ‘पुणे प्राईम न्यूज’ चे उपसंपादक युनूस तांबोळी यांच्या हस्ते प्रसारण करण्यात आले. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील दिग्ददर्शक भरत रोडे यांनी ‘फिटमफाट’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. यासाठी लेखक म्हणून दत्तात्रेय वाळुंज यांनी विशेष भुमीका पार पाडली आहे. दिपावली पाडव्याचे औचित्य साधून या लघुपटाचे प्रसारण करण्यात आले.
वंचीत घटकांमध्ये आजही शिक्षणाविषयी आस्था नाही. त्यामुळे या समाजातील मुले पारंपारिक व्यवसायाकडे वळताना दिसतात. लहानपणी मिळणारे प्राथमिक शिक्षक या मुलांची दिशा बदलू शकते. यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. यासाठी या लघुपटाची निर्मीती करण्यात आली आहे. जवळपास 30 मिनिटे चालणारा हा लघुपट शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी झटणाऱ्या शिक्षकाचा आहे. त्यासाठी वंचीत कुटूंबातील गरीबी व त्यांना शिक्षणाच्या येणाऱ्या अडचणी व गैरसमज दाखवून देण्यात लेखक यशस्वी झाला आहे. या लघुपटाला सर्वस्थरातून मान्यतेच्या लाईक व कॅामेन्टस येऊ लागल्या आहेत.
आजही वंचीत समाजात शिक्षणा विषयी गैरसमज आहेत. त्यामुळे शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘फिटमफाट’ लघुपटातून प्रयत्न केला आहे. यापुढेही नव्याने ‘बाजार’ हा लघुपट चे चित्रण केले जाणार आहे. यासाठी कलाकारांची निवड करणे सुरू झाले असून नवोदित कलाकारांना यासाठी संधी देण्यात येणार आहे. या लघुपटासाठी युनूस तांबोळी हे दिग्दर्शकाची भुमिका पार पाडणार आहेत. भरत रोड दिग्ददर्शक फिटमफाट