Fire वाल्हे, (पुणे) : चारचाकी गाडीला अचानक लागलेल्या आगीत दोघेजण थोडक्यात बचावले आहेत. मात्र, या आगीत (Fire) चारचाकी (car) गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. वाल्हे-राऊतवाडी मार्गावरील हरणी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत सोमवारी (ता. ०१) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मनोज जगन्नाथ भोसले व अथर्व संजय गुळूमकर (रा. दोघेही जोगवाडी, ता. बारामती) अशी या अपघातात वाचलेल्या दोघांची नावे आहेत. इंजिनजवळील वायर्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने हि आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
मनोज जगन्नाथ भोसले व त्यांचा भाचा अथर्व संजय गुळूमकर हे स्कोडा सुपरब या चारचाकी गाडीने वीर येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना हरणी गावच्या हद्दीत अचानक मोटारीच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यांनी तत्काळ मोटार रस्त्यालगत घेतली आणि ते मोटारीतून बाहेर पडले. तेवढ्यात संपूर्ण मोटारीला आगीने वेढले.
या घटनेची माहिती वाल्हे पोलिस दूरक्षेत्रात देण्यात आली. दुर्घटना झालेले ठिकाण हे निर्जन असल्याने त्या ठिकाणी भोसले व गुळूमकर यांना तत्काळ मदत मिळू शकली नाही.
दरम्यान, मोटार जळून खाक झाली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. इंजिनजवळील वायर्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने मोटारीला आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Fire : पुण्यात मध्यरात्री लागलेल्या आगीत ४ दुकाने जळून खाक ; तर दोन जण गंभीर जखमी
Fire : शिक्रापुर येथे कपड्याचे दुकान आगीत जळून खाक ; सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान