Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरला रिक्षातून चाललेल्या महिलेच्या बॅगेतील रोख रकमेसह 6 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दगिन्यांवर महिला चोरट्यांनी मारला डल्ला

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 14 July 2026, 17:29

लोणी काळभोर, ता. १४ : पालखी सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पुन्हा एकदा हातचलाखीचा डाव साधला आहे. हडपसर गाडीतळ ते लोणी काळभोर दरम्यान सिक्स सीटर रिक्षातून प्रवास करणाऱ्या ५१ वर्षीय महिलेच्या बॅगेतील सोन्या-चांदीचे दागिने आणि २० हजारांची रोख रक्कम १२ जुलै रोजी लंपास केली आहे. त्याची चालू बाजार भावाप्रमाणे 6 लाख 20 हजारांहून अधिक रुपये किंमत होत आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधु लक्ष्मण सुकाळे (रा. सध्या पुणे, मूळ रा. सोनेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधु सुकाळे या बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी पुण्यात आल्या होत्या. मुलगा प्रशांत याने शेतीच्या पेरणीसाठी दिलेले २० हजार रुपये आणि लग्नासाठी आणलेले सोन्या-चांदीचे दागिने त्यांनी पर्समध्ये ठेवले होते. त्या पिंपळे गुरव येथून बसने हडपसर गाडीतळ येथे उतरल्या. लोणी काळभोरला जाण्यासाठी बसची चौकशी करत असताना, सुमारे २४ वर्षीय एका अनोळखी तरुणीने “पालखीमुळे पीएमपीएमएल बस बंद आहेत, आपण रिक्षाने जाऊ” असे सांगितले.

यानंतर दोघी एका एमएच-१२ क्यूआर-५३०५ क्रमांकाच्या सिक्स सीटर रिक्षात बसल्या. रिक्षामध्ये आधीच चार महिला बसलेल्या होत्या. प्रवासादरम्यान समोर बसलेल्या महिलांपैकी एक वारंवार सीटवर हालचाल करत होती, तर तिच्या शेजारील दोन महिला साडीचा पदर वापरून बॅग झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. कदमवाकवस्ती येथे उतरून मुलीच्या घरी गेल्यानंतर बॅग तपासली असता पर्समधील १८ ग्रॅमचे मिनी गंठण, १० ग्रॅमचे सोन्याचे मण्यांचे गंठण, १० ग्रॅमचे झुमके, नथ, कानातील वेल, ३०० ग्रॅम वजनाची चांदीची वाटी आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम असा चालू बाजार भावाप्रमाणे एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे उघड झाले.

या प्रकरणामुळे पालखीच्या गर्दीत सक्रिय असलेल्या महिला चोरट्यांच्या टोळीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. भाविक आणि नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत अशा टोळ्या हातचलाखीने चोरी करत असल्याने प्रवाशांनी विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज, रिक्षाचालक आणि संशयित महिलांचा शोध सुरू केला आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post
Loni kalbhor

लोणी काळभोर येथे दारूच्या नशेत विद्यार्थ्यांना शिवीगाळ; पोलिसांनाही दमदाटी, सरकारी कामात अडथळा, तिघांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp