अरुण भोई
राजेगाव, (दौंड) : दौंड तालुक्यातील भीमा नदीपात्र गेल्या दीड महिन्यांपासून कोरडे ठाक पडले होते. भीमा नदीवरील वरच्या भागातील बंधाऱ्यांचे दरवाजे उघडल्याने तसेच पाऊस झाल्यामुळे विद्युत पंप बंद आहेत, त्यामुळे भीमा नदीपात्रात पाणी आले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, यावर्षी जवळपास १०० टीएमसी पाणीसाठा असलेले उजनी जलाशय शासनाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे भीमा नदीपात्र गेल्या दीड महिन्यांपासून कोरडे ठाक पडले होते.
दौंड तालुक्यातील मलठण, वाटलुज, नायगाव, खानवटे, या गावांमधील पिके जळून गेली आहेत. शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. भामा आसखेड धरणामधून आलेले दोन टीएमसी पाणी पुन्हा सुरू होणार आहे. भीमा नदीपात्र कोरडे ठाक पडल्याने राजेगाव, वाटलुज, खानवटेसह परिसरातील सर्वच गावांच्या नळ पाणी योजना बंद होत्या.
त्यामुळे मोठे पाण्याचे संकट निर्माण झाले होते. नदीला पाणी आल्याने त्या आता पूर्ववत सुरू होतील. देवळगावराजे बंधाऱ्यापर्यंतच पोहोचले आणि नदीपात्रातील वरील बंधाऱ्यांचे सर्व दरवाजे बंद केल्याने पाणी तेथेच साठून राहिले होते. पुराच्या पाण्याचा धोका टाळण्यासाठी १५ मेपासून नदीपात्रातील सर्वच बंधाऱ्यांचे दरवाजे दरवर्षी खुले करतात.
ते खुले केल्याने व वरील भागात काही प्रमाणात झालेल्या पावसामुळे विद्युत पंप बंद आहेत. त्यामुळे हे पाणी आले आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करत होते. परंतु काल दुपारी पाणी आल्याने या परिसरातील शेतकरी आनंदित झाले आहेत.