पुणे : केंद्र-राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये स्व.गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा समावेश आहे. अपघाती मृत्यू ,शेतात काम करताना अंगावर वीज पडल्यास, पुरात वाहून गेल्यास, साप चावल्यास यासह इतर कारणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा शारिरिक विकलांग आल्यास त्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी या हेतुने राज्य शासनाने ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी कुटुंबातील सोमनाथ पोपट फडतरे यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यावेळी नायगाव येथील दैनिक प्रभातचे पत्रकार चंद्रकांत चौंडकर यांनी फडतरे कुटूंबाची भेट घेतली व त्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याची माहिती दिली. त्यांनतर सोमनाथ फडतरे यांचा मुलगा अक्षय फडतरे यांच्याकडून कागदपत्रे पूर्तता करून घेतली व नुकतीच त्यानां दोन लाख रुपयांची मदत मिळाली आहे.
गोपीनाथ मुंडे अपघा विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चंद्रकांत चौंडकर यांनी मोलाची मदत केली, तसेच सतत पाठ पुरावा करून मदत मिळवून दिल्याचे फडतरे कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले. सोमनाथ फडतरे त्यांच्या मागे त्यांच्या आई, पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे. तसेच यासाठी तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, कृषी पर्यवेक्षक यू पी वाघोले, पांडुरंग कवीतके, कृषी सहाय्यक अमर मोहिते, पोलीस हवालदार संदिप कारंडे, सामाजिक कार्यकर्ते बबन जाधव यांनीही सहकार्य केल्याचे चंद्रकांत चौंडकर यांनी सांगितले.
खरं तर फडतरे कुटुंबाच दुःख यामुळे कमी होणार नाही. पण त्यांच्या कुटुंबाला थोडाफार हातभार होणार आहे. जेव्हा आम्ही आशी मदत करतो त्याचा एक वेगळाच आनंद व समाधान वाटते. आजपर्यंत अनेकांना शैक्षणिक मदत, शासनाची मदत, दवाखान्यासाठी मदत आशा अनेक मदती केल्या आहेत. अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे व पुढेही ज्यांना ज्यांना मदत करता येईल ती करणार आहे.
चंद्रकांत चौंडकर, दैनिक प्रभातचे पत्रकार व माजी उपसरपंच, नायगाव, ता. पुरंदर