उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक परिसरात एका ट्रकचालकाला ट्रकमधून ओढून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. शनिवारी (ता. 14) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा ट्रकचालक हा सोलापूर बाजूकडून पुण्याच्या बाजूकडे निघाला होता. यावेळी यवत परिसरात दोन चारचाकी गाड्यांना कट मारला व त्यांच्या गाड्यावर दगडफेक केली. अशी माहिती नागरिकांनी दिली.
यावेळी सदरचा ट्रकचालक हा त्या ठिकाणावरून पळून आला. यावेळी काही नागरिकांनी त्याला उरुळी कांचन येथून जेजुरीकडे जात असताना काही जणांनी ट्रक चालकाला ट्रकमधून काढून बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस दाखल झाले आहेत.
दरम्यान, मारहाण झालेल्या ट्रकचालकाचे व मारहाण केलेल्या तरुणांची नावे अद्याप समजू शकली नसून परिसरात यावेळी नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.