थेऊर, (पुणे) : कोलवडी (ता. हवेली) येथील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात लोणकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. ही घटना बुधवारी (ता. 30) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलवडी येथील गजानन गायकवाड आणि आकाश अडसुळे यांनी सचिन लोणकर यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी लोणकर यांच्या वाहनाचीही तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे.


या घटनेमुळे कोलवडी परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील कारण आणि घटनेचा नेमका तपशील पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात






