Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी हुंड्यासाठी छळ, मग गर्भपात अन् घटस्फोटापूर्वीच पतीने केले दुसरे लग्न! वडकीत सहा जणांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 6 November 2026, 11:55

लोणी काळभोर, ता. ६ : लग्नात माहेरच्यांनी २५ लाख रुपये खर्च करूनही सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहितेच्या स्त्रीत्वावर संशय घेत तिला अपमानित करणे, मारहाण करणे, माहेरून १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावणे, तसेच गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप पीडित विवाहितेने केला आहे. एवढेच नव्हे, तर घटस्फोटासाठी ७० लाख रुपये देण्याचे आश्वासन देऊन त्यापैकी २१ लाख रुपये दिल्यानंतर पतीने घटस्फोट होण्यापूर्वीच दुसरे लग्न केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी वडकी (ता. हवेली) येथिल 24 वर्षीय विवाहितेने पती ऋषिकेश अभिमान वायबसे, सासू रुक्मिणी वायबसे, सासरे अभिमान वायबसे, नणंद विद्या बिक्कड, दीर श्रीकांत वायबसे आणि विवाह जमविणारे मध्यस्थ वालचंद मुंडे यांच्याविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह ६ जून २०२५ रोजी लातूर येथील ऋषिकेश वायबसे यांच्याशी झाला होता. विवाहावेळी त्यांच्या आई-वडिलांनी १५ लाख रुपये वरदक्षिणा, एक तोळ्याची सोन्याची अंगठी, तसेच लग्नाचे साहित्य व खर्चासाठी १० लाख रुपये असा एकूण २५ लाख रुपयांचा खर्च केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लग्नानंतर सुरुवातीचा एक महिना चांगला गेल्यानंतर सासू व नणंद यांनी माहेरच्या आर्थिक परिस्थितीवरून टोमणे मारण्यास सुरुवात केली. लग्नात अपेक्षेप्रमाणे मानपान केला नसल्याचे सांगून वारंवार अपमानित केले जात असल्याचा आरोप आहे.

दरम्यान, पतीच्या प्रिंटिंग व्यवसायासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर पती व सासऱ्यांच्या सांगण्यावरून मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. नणंदेने फिर्यादी यांच्या स्त्रीत्वाबाबत संशय व्यक्त करून डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेल्याचा तसेच त्या महिला नसल्याचे आरोप करून मानसिक छळ केल्याचा दावा करण्यात आला आहे.

ऑक्टोबर २०२५ मध्ये तेजश्री गर्भवती असल्याचे समजल्यानंतरही सासरच्या मंडळींनी त्यांना मूल होऊ देणार नसल्याचे सांगून घराबाहेर काढल्याचा आरोप आहे. ६ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचे दागिने काढून घेत घरातून हाकलून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर माहेरच्या मंडळींनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत तेजश्री या महिला असून तीन महिन्यांच्या गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुढे घटस्फोट घेण्याच्या बदल्यात ७० लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यापूर्वी गर्भपात करण्याची अट घालण्यात आली आणि हडपसर येथील रुग्णालयात गर्भपात करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. २२ जुलै २०२६ रोजी घटस्फोटाच्या बाँडवर स्वाक्षरी घेतल्यानंतर त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यावर २१ लाख रुपये जमा करण्यात आले. मात्र, त्यानंतर पतीने घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच दुसरे लग्न केल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. याबाबत जाब विचारला असता उर्वरित ४९ लाख रुपये देणार नसल्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणात विवाहापासून ते आजपर्यंत हुंड्याची मागणी, शारीरिक व मानसिक छळ, स्त्रीत्वाबाबत अपमानास्पद आरोप, गर्भपातासाठी दबाव आणि घटस्फोटासाठी धमकावल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 115(2),3(5),351(2),352,85 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हडपसरमध्ये चिमुकल्यावर कुत्र्याचा अचानक हल्ला! सायकल घेऊन निघाला, बेसमेंटमधील आवाजाने थांबला अन् क्षणात…

Friday, 6 November 2026, 12:07

आधी हुंड्यासाठी छळ, मग गर्भपात अन् घटस्फोटापूर्वीच पतीने केले दुसरे लग्न! वडकीत सहा जणांवर गुन्हा दाखल

Friday, 6 November 2026, 11:55

मुंबई-बंगळुरूनंतर महाराष्ट्राला आणखी एक स्लीपर वंदे भारत! कोणत्या शहरांना मिळणार हायस्पीड रेल्वेची भेट?

Friday, 6 November 2026, 11:42

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट!लता, सुशील हगवणे आणि नीलेश चव्हाण यांना कोर्टाचा दिलासा,कडक अटी शर्थीसह जामीन…

Friday, 6 November 2026, 11:06

रुग्णालयाचा पत्ता विचारायचा बहाणा अन् विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकावला एमआयटी कॉलेजजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांचा धुमाकूळ

Friday, 6 November 2026, 10:49

पुण्यात स्वाइन फ्लूचा कहर! तब्बल 879 रुग्णांची नोंद,आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली…

Friday, 6 November 2026, 10:39
Next Post

हडपसरमध्ये चिमुकल्यावर कुत्र्याचा अचानक हल्ला! सायकल घेऊन निघाला, बेसमेंटमधील आवाजाने थांबला अन् क्षणात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp