Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून अभियंत्याला 25 लाखांचा गंडा, मामा-भाचा पसार; दोघांवर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 19 March 2026, 11:05

फुरसुंगी, ता. 19 : जादा परताव्याचे आमिष दाखवून आणि चक्क बँकांमधून कर्ज काढून गुंतवणूक करण्यास भाग पाडून एका अभियंत्याची 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार फुरसुंगी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांवर फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश सुभाष केदार, (वय 39 वर्षे, धंदा नोकरी, रा. मॅजेस्टिीक नेस्ट, बी-विंग, रुम नं 802, फुरसुंगी असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी केदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मल्लिनाथ आण्णाप्पा सुतार, रा बी/1202, मॅजेस्टीक इम्पिरिया, फुरसुंगी, पुणे (मूळ रा. मु पो शिंगडगांव वळसंग, ता दक्षिण सोलापुर, जि सोलापुर) व रामचंद्र गुराप्पा सुतार, राठी ओंकार निवास, प्रगती कॉलनी, लेन नं 07, विश्रामबाग, सांगली) असे फसवणूक करणाऱ्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश केदार हे 2017 पासून मॅजेस्टिक इम्पेरिया सोसायटीत राहत असताना त्यांची ओळख शेजारी राहणारे मल्लीनाथ सुतार यांच्याशी झाली. सुतार याने आपण ‘एम.एस. इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स सोल्युशन’ नावाची कंपनी चालवत असल्याचे सांगून, गुंतवणुकीवर मासिक 3ते 3.5 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. केदार यांनी पैसे नसल्याचे सांगताच, सुतार याने आपल्या ओळखीने बँकांमधून कर्ज काढून देतो आणि त्याचे हप्ते मीच भरतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

डिसेंबर 2021 मध्ये एका महिला एजंटमार्फत सुतार याने केदार यांच्या नावावर एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, अ‍ॅक्सिस, आदित्य बिर्ला आणि फुलटट्रॉन अशा सहा बँकेकडून व संस्थांकडून एकूण 25 लाख 14 हजार 209 रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. ही सर्व रक्कम केदार यांनी सुतार याचा मामा रामचंद्र गुराप्पा सुतार (रा. सांगली) याच्या बँक खात्यावर एनईएफटी द्वारे वर्ग केली.

सुरुवातीला एप्रिल 2023 पर्यंत मल्लीनाथ सुतार याने कर्जाचे हप्ते आणि परतावा मिळून दरमहा 78 हाजार 502 रुपये असे एकूण 11 लाख 77 हजार 868 रुपये केदार यांना दिले. मात्र, मे 2023 पासून त्याने हप्ते भरणे बंद केले. केदार यांनी वारंवार विचारणा केली असता, “हिशोब मामाकडे आहे,” अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन नंतर दोन्ही आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद करून पोबारा केला.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निलेश केदार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी मल्लीनाथ सुतार आणि रामचंद्र सुतार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32

Daund News : दौंड पोलिसांना धक्काबुक्की करून पळण्याऱ्या तडीपार आरोपीला अखेर बेड्या

Sunday, 17 May 2026, 15:27
Next Post

कुंजीरवाडीत तलवारीसह दोन तरुण जेरबंद, संभाव्य गुन्हा टळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.