Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चौफुला-न्हावरा मार्गावर आयशरचा धुमाकूळ; कुंजीरवाडीतील युवकाचा अपघातात मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 July 2026, 17:50

दौंड, ता. ८ : चौफुला-न्हावरा मार्गावर अवजड वाहनांच्या बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, दोन वेगवेगळ्या अपघातांनी पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पारगाव येथील २२ फाटा परिसरात भरधाव आयशर टेम्पोने पिकअपला समोरून धडक देऊन दोन जणांना जखमी केल्यानंतर चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. तर सहजपूर फाट्याजवळ झालेल्या दुसऱ्या भीषण अपघातात कुंजीरवाडीत वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणी यवत पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

पहिल्या घटनेत काझड (ता. इंदापूर) येथील रोहित भारत म्हेत्रे (वय २८) यांनी यवत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ते बारामती महावितरणचे खासगी कंत्राटदार असून, मित्र अक्षय झगडे यांच्या मालकीच्या महिंद्रा पिकअप (एमएच-४२ बीयू-१६५१) मधून कामगार जीवन वाढवे याच्यासह देलवडी येथे कामासाठी जात होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास पारगाव येथील २२ फाटा परिसरात राजस्थान ढाब्यासमोर समोरून आलेल्या एचआर-६३ जी-१८२१ क्रमांकाच्या आयशर टेम्पोने भरधाव वेगात येत पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात रोहित म्हेत्रे व जीवन वाढवे हे किरकोळ जखमी झाले, तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, अपघातानंतर आयशरचा चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या आणि अधिक भीषण अपघातात बोरीबेल (ता. दौंड) येथील यश दत्तात्रय पोटे (वय १९) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत त्याचा भाऊ आदित्य दत्तात्रय पोटे यांनी यवत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यश पोटे हा गेल्या काही महिन्यांपासून कुंजीरवाडी येथे आपल्या चुलत्याकडे राहत होता. ८ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास तो हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जात असताना सहजपूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एमएच-४३ बीएक्स-६९०४ क्रमांकाच्या आयशर वाहनाने अचानक लेन बदलत राँग साईडने येऊन त्याच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, यश पोटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना यवत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी आयशर चालक श्रीशैल सिद्रामय्या स्वामी (रा. रबाळे, नवी मुंबई) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

चौफुला-न्हावरा मार्गावर वाढते अपघात चिंतेचा विषय
चौफुला-न्हावरा मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. भरधाव वेग, लेनचे उल्लंघन आणि वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे या मार्गावर सातत्याने गंभीर अपघात होत आहेत. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या मार्गावर वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 19 August 2026, 22:55

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48
Next Post

Yavat News : भांडगाव येथे 3 गावठी पिस्तुल आणि 15 जिवंत काडतुसांसह तिघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.