Thursday, August 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : भांडगाव येथे 3 गावठी पिस्तुल आणि 15 जिवंत काडतुसांसह तिघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची कामगिरी..

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Wednesday, 8 July 2026, 17:53

यवत (पुणे) : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भांडगाव गावच्या हद्दीतून तीन सराईत आरोपींकडून 3 अवैध गावठी पिस्तुल (कट्टे) आणि तब्बल 15 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई करीत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मंगेश शंकर मासोळे (वय -24), सूरज संजय शेलार (वय-26), रोहित प्रेमदास भुजवणे (वय 24, सर्व रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहनासह एकूण 5 लाख 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक यवत परिसरात मंगळवारी (ता. 07) पेट्रोलिंग (गस्त) घालत असताना, त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली कि, भांडगाव परिसरात एक नंबर नसलेली पांढऱ्या रंगाची बलेनो कार संशयास्पदरीत्या फिरत असून, त्यामधील तीन इसमांकडे प्राणघातक गावठी पिस्तुल असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिसांच्या पथकाने भांडगाव येथील सोनाक्षी मंगल कार्यालयासमोर सापळा लावून संशयास्पद बलेनो कार शिताफीने अडवली. कार थांबवून पोलिसांनी मंगेश मासोळे, सूरज शेलार आणि रोहित भुजवणे या तिघांना खाली उतरवून त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली, तेव्हा तिन्ही आरोपींच्या कमरेला आणि खिशात बेकायदेशीररीत्या बाळगलेली एकूण 3 गावठी पिस्तुल आणि 15 जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी तात्काळ सर्व शस्त्रे आणि विना नंबरची बलेनो कार पंचांसमक्ष जप्त केली.

 

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना यवत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवतचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शेख, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीण, विकास पाटील, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, योगेश नागरगोजे, विकास कापरे, आणि यवत ठाण्याचे संदीप देवकर, धीरज जाधव व मोहन भानवसे यांनी केली.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 19 August 2026, 22:55

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48
Next Post

"पुन्हा पंपावर दिसलास तर गाडीखाली चिरडून टाकीन"; शिरूरमध्ये पेट्रोलपंप व्यवस्थापकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.