Wednesday, July 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“पुन्हा पंपावर दिसलास तर गाडीखाली चिरडून टाकीन”; शिरूरमध्ये पेट्रोलपंप व्यवस्थापकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 July 2026, 17:57

शिरूर, ता. ८ : पेट्रोलपंपाच्या गार्डनसाठी पाणीपुरवठा करणारा टँकर बंद केल्याच्या कारणावरून पेट्रोलपंप व्यवस्थापकाला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी संतोष सतीश चंदनशिवे (वय २६, रा. केडगाव, ता. दौंड) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर संतोष रामदास जाधव (रा. न्हावरे, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष चंदनशिवे हे गेल्या पाच वर्षांपासून न्हावरे येथील अमरदीप पेट्रोलियम (भारत पेट्रोलपंप) येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वी पेट्रोलपंपाच्या गार्डनसाठी लागणाऱ्या पाण्याचा टँकर आरोपी संतोष जाधव याच्याकडून घेतला जात होता. मात्र, नंतर दुसऱ्या टँकरची सेवा सुरू केल्याने आरोपीचा टँकर बंद करण्यात आला.

याच कारणाचा राग मनात धरून ५ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आरोपी इनोव्हा कारमधून पेट्रोलपंपावर आला. त्याने फिर्यादीला, “तुला खूप माज आला आहे का? माझा टँकर का बंद केला? माझ्या पोटावर पाय दिलास,” असे म्हणत वाद घातला. त्यानंतर फिर्यादी अनुसूचित जातीतील असल्याचे माहीत असतानाही त्याला जातिवाचक अपशब्द वापरून अपमानित केले. तसेच, “पुन्हा पंपावर दिसलास तर जिथे दिसशील तिथे गाडीखाली चिरडून टाकीन,” अशी धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

घटनेनंतर संतोष चंदनशिवे यांनी हा प्रकार पेट्रोलपंप मालक रत्नदीप कांबळे आणि आपल्या भावाला सांगितला. त्यानंतर त्यांनी शिरूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ मधील कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 351(2), 351(3) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ट्रॅफिकचा ‘हाय अलर्ट’! उद्या पुण्यात पालखी सोहळ्यामुळे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Wednesday, 8 July 2026, 19:19

दादागिरीचा शेवट अटकेत! डॉक्टर -नर्स मारहाणप्रकरणी शिवसेना नगरसेवकांवर मोठी कारवाई

Wednesday, 8 July 2026, 18:47

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी; इंदापूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Wednesday, 8 July 2026, 18:20

भीमाशंकरकडे जाणारा रस्ता ठप्प! दरड कोसळल्याने वाहतूक रोखली; पावसाचा जोर कायम असल्याने धोका कायम

Wednesday, 8 July 2026, 18:15

कारभारात हलगर्जी महागात; उपमुख्यमंत्री शिंदेंनी सहाय्यक आयुक्ताला दाखवला बाहेरचा रस्ता,नेमकं काय घडलं?

Wednesday, 8 July 2026, 18:06

“पुन्हा पंपावर दिसलास तर गाडीखाली चिरडून टाकीन”; शिरूरमध्ये पेट्रोलपंप व्यवस्थापकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Wednesday, 8 July 2026, 17:57
Next Post

कारभारात हलगर्जी महागात; उपमुख्यमंत्री शिंदेंनी सहाय्यक आयुक्ताला दाखवला बाहेरचा रस्ता,नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.