Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कारभारात हलगर्जी महागात; उपमुख्यमंत्री शिंदेंनी सहाय्यक आयुक्ताला दाखवला बाहेरचा रस्ता,नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 8 July 2026, 18:06

मुंबई : मागील काही दिवसांपासून ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. यावेळी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त यासीन तडवी यांना 8 दिवसांसाठी तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले.

आपत्कालीन परिस्थितीत शहरात विविध ठिकाणी दुर्घटना घडत असताना, आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती हाताळणे गरजेचे होते. मात्र, अनेक महत्त्वाच्या ठिकाणी यासीन तडवी अनुपस्थित असल्याचे समोर आले. इतकेच नव्हे तर उपमुख्यमंत्र्यांच्या अचानक झालेल्या दौऱ्यादरम्यानही ते हजर नव्हते. अधिकाऱ्याचा हा निष्काळजीपणा पाहून एकनाथ शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि जागेवरच त्यांच्या निलंबनाची कारवाई केली.

कक्षाची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संकटकाळात जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. कामचुकारपणा करणाऱ्यांवर यापुढे थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने पूर्ण क्षमतेने काम करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

 

यावेळी शहरातील परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी खालील महत्त्वाचे निर्णय व निर्देश दिले:आपत्तीच्या काळात कामाचा वाढता ताण पाहता, ठाणे पालिकेत आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून तातडीने नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल.

झाडे हटवणे व पाण्याचा निचरा: सखल भागात साचलेले पाणी त्वरित उपसणे आणि उन्मळून पडलेली झाडे रस्त्यावरून तातडीने बाजूला करण्याचे आदेश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले.

वृक्ष प्राधिकरण सक्षमीकरण: ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बाप्पाच्या आगमनापूर्वी पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरातील ‘हे’ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

Sunday, 13 September 2026, 15:43

बारामतीत भयंकर प्रकार! अज्ञात बेडरूममध्ये घुसला, टॉवेलने गळा आवळून तिला संपवलं; नेमकं काय घडलं?

Sunday, 13 September 2026, 15:08

मुंबई मोर्चाआधीच जरांगेंना पोलिसांचा ‘रेड सिग्नल’! आझाद मैदानावरील परवानगी नाकारली; आंदोलनाला धक्का

Sunday, 13 September 2026, 14:28

पतीच्या प्रायव्हेट पार्टची हळद-कुंकू लावून पूजा! पुण्यात ‘तुझ्या नवऱ्याला मंगळदोष आहे’ सांगत जादूटोणा अन् अघोरी कृत्याचा भयानक प्रकार…

Sunday, 13 September 2026, 14:27

पुण्यात पहाटेच्या अंधारात थरार! दोन अल्पवयीन नशेत कोयते घेऊन रस्त्यावर; दहशतीने नागरिक घराबाहेर, नेमकं काय घडलं?

Sunday, 13 September 2026, 14:18

मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहनांची जोरदार धडक; 2 जणांचा जागीच मृत्यू, 12 जण गंभीर जखमी

Sunday, 13 September 2026, 13:53
Next Post

भीमाशंकरकडे जाणारा रस्ता ठप्प! दरड कोसळल्याने वाहतूक रोखली; पावसाचा जोर कायम असल्याने धोका कायम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp