Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पतीच्या प्रायव्हेट पार्टची हळद-कुंकू लावून पूजा! पुण्यात ‘तुझ्या नवऱ्याला मंगळदोष आहे’ सांगत जादूटोणा अन् अघोरी कृत्याचा भयानक प्रकार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 13 September 2026, 14:27

पुणे : अंधश्रद्धेच्या नावाखाली २९ वर्षीय विवाहित महिलेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार चंदननगर परिसरात समोर आला आहे. पतीला मंगळदोष असल्याचे सांगून तो दूर करण्याच्या नावाखाली महिलेला कथित अघोरी कृत्ये करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. यामध्ये पतीच्या खासगी अवयवाला हळदी-कुंकू लावून त्याची पूजा करण्यास महिलेला भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, विवाह ठरण्यापूर्वीच सासरच्या मंडळींनी महिलेच्या कुटुंबीयांकडे १५ लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली होती. मुलीचा विवाह होण्यासाठी तिच्या वडिलांनी २ लाख २० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने दिले. मात्र, विवाहानंतर उर्वरित हुंड्याची रक्कम न दिल्याच्या कारणावरून महिलेचा कथित छळ सुरू झाला.

दरम्यान, महिलेच्या पतीला मंगळदोष असल्याचे सांगण्यात आले. हा दोष दूर करण्यासाठी भोंदूबाबाच्या सांगण्यावरून महिलेला विविध अघोरी प्रकार करण्यास भाग पाडल्याचा आरोप तिने केला आहे. कथित अघोरी विधीचा एक भाग म्हणून अंगारा पाण्यात मिसळून पिण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर पतीच्या खासगी अवयवाला हळदी-कुंकू लावून त्याची पूजा करण्यासही महिलेला भाग पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गेल्या चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप महिलेने केला आहे. पतीचा मंगळदोष दूर झाला असल्याचे सांगून सासरच्या मंडळींनी तिला नांदवण्यास नकार दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तसेच मंगळदोष दूर करण्याच्या कारणाखालीच आपल्याशी विवाह करण्यात आल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

 

सासरच्या छळाला कंटाळल्यानंतर महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. हुंड्याची मागणी, कथित अघोरी कृत्ये आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली झालेल्या छळाच्या सर्व आरोपांची पोलीस चौकशी करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Daily Horoscope: मालव्य अन् लक्ष्मीनारायण योग! 16 ऑक्टोबरला कोणाचं भाग्य बदलणार? पाहा 12 राशींचं भविष्य

Friday, 16 October 2026, 8:06

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44
Next Post

मुंबई मोर्चाआधीच जरांगेंना पोलिसांचा ‘रेड सिग्नल’! आझाद मैदानावरील परवानगी नाकारली; आंदोलनाला धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp