Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाप्पाच्या आगमनापूर्वी पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरातील ‘हे’ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 13 September 2026, 15:43

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाची मूर्ती वाजतगाजत घरी आणण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहरातील छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग आणि मुंढवा-केशवनगर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत आज (रविवार) आणि उद्या (सोमवार) बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीरामभय्या चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांना संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक या मार्गाने इच्छित स्थळी जाता येईल. शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक आणि टिळक रस्त्याने पुढे जाता येणार आहे. झाशीची राणी पुतळा चौक आणि खुडे चौकाकडून कुंभारवेसकडे जाणारी वाहने छत्रपती शिवाजी पुलावरून डावीकडे वळून मार्गस्थ होतील.

सारसबाग परिसरातील नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ केंद्रापर्यंत वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, या रस्त्यावर पार्किंगला मनाई करण्यात आली आहे. भाविकांना मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौकाची डावी बाजू आणि नीलायम चित्रपटगृहाजवळ वाहने पार्क करता येणार आहेत.

गणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यवर्ती भागातील वाहतुकीतही बदल करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असून, कसबा पेठेतील फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक आणि मंगला चित्रपटगृहासमोरील रस्ता या ठिकाणी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

 

मुंढवा-केशवनगर परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊनही मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. शिवाजी महाराज चौकातून मांजरीकडे जाणारी वाहने गायरान वस्ती रस्ता, विहान सोसायटी आणि मांजरी रस्त्याने जातील. खराडी पुलाकडून येणारी वाहने रेणुकामाता मंदिर, विहान सोसायटी रस्ता आणि शिवाजी महाराज चौकातून मार्गस्थ होतील. मुंढवा चौक, शिवाजी महाराज चौक ते कल्याणी बंगला रस्ता, शिवाजी महाराज चौक ते झेड कॉर्नर आणि केशवनगर परिसरात जड वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे.

दरम्यान, शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. या बस स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना आणि टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जातील. महापालिका भवन परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने मार्गस्थ होतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

पार्किंगला मनाई असलेले प्रमुख मार्ग : कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा, वीर संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा चौक, टिळक पूल ते भिडे पूल नदीपात्रातील रस्ता, मंडईतील वाहनतळ तसेच छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौकाची डावी बाजू.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Daily Horoscope: मालव्य अन् लक्ष्मीनारायण योग! 16 ऑक्टोबरला कोणाचं भाग्य बदलणार? पाहा 12 राशींचं भविष्य

Friday, 16 October 2026, 8:06

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44
Next Post

बारामतीत तरुणाचे विवाहितेसोबत प्रेमसंबंध; तिच्या नवऱ्याला प्रकरण समजताच स्वतःच्याच डोक्यात रिवॉल्वर मधून झाडली गोळी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp