Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अंमली पदार्थांच्या फॅक्टरीचा पर्दाफाश! १५ लाख लिटर ‘विषारी दारू’ बनवण्याचा कट उधळला; कुरकुंभमध्ये मोठी कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 17 July 2026, 20:44

पुणे : पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथे अंमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत विषारी दारू निर्मितीचा मोठा कट उधळून लावला आहे. या कारवाईत हजारो किलो प्रतिबंधित रसायन, मोठ्या प्रमाणातील रॉ केमिकल तसेच उत्पादनासाठी वापरली जाणारी महागडी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे.

तपासादरम्यान कुरकुंभ येथील एका कारखान्यातून ३४२० किलो वजनाचा फिकट पिवळ्या-पांढऱ्या रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ आणि तो तयार करण्यासाठी लागणारे सुमारे ५८०० लिटर रॉ केमिकल जप्त करण्यात आले. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार हा पदार्थ प्रतिबंधित ‘क्लोरल हायड्रेट’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रसायनाचा वापर विषारी दारू तयार करण्यासाठी केला जात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

तपासानुसार, जप्त करण्यात आलेल्या ३४२० किलो रसायनापासून सुमारे १५ लाख लिटर विषारी दारू तयार केली जाऊ शकली असती. त्यामुळे ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या प्रकरणात किशोर दत्तात्रय सुर्वे, शैलेश विठ्ठल ठाकूर, नबी सरवर जमीर सिद्दीकी आणि आदेश विठ्ठल पाचांगणे हे अवैध कारखाना चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. संबंधित कारखाना किशोर सुर्वे यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले असून, जप्त करण्यात आलेले रसायन शैलेश ठाकूर याने तयार केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

कारखान्यात मेफेड्रॉनसारख्या अंमली पदार्थांच्या उत्पादनासाठी वापरली जाणारी सेंट्रीफ्यूगल मशीन आणि जीएलआर मशीनही आढळून आली. या यंत्रसामग्रीची अंदाजे किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून जप्त करण्यात आलेल्या रसायनांचा नेमका वापर, त्यामागील रॅकेट आणि त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11

भोसरी येथे घराचा दरवाजा वाजविल्याचा जाब विचारताच तलवारीने हल्ला; बाप-लेकाच्या हत्येचा प्रयत्न, दोघे अटकेत

Sunday, 29 November 2026, 12:07

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर टँकरद्वारे डल्ला? यवत येथे शेतीच्या पाण्याचा रस्त्याच्या कामासाठी उपसा; परिसरातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा

Sunday, 29 November 2026, 12:04
Next Post

एसटी प्रवाशांना मोठा धक्का! भाड्यात थेट १३.५६ टक्क्यांची वाढ; प्रवासासाठी आता खिशाला कात्री

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp