पुणे : गेले काही दिवस पावसाचा जोर वाढल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरण भरले आणि त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मूळा मुठा नदीत पत्राला पूर येऊन सगळीकडे पाणी शिरले. सर्व परिसर जलमय होऊन अनेकांच्या घरात पाणी जाऊन संसार पाण्यावर तरंगू लागला होता. पुणे शहराची घाण ही नदीत येऊन त्यात प्लास्टिकचा कचरा तसेच जलपर्णी हे मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबर वाहून आले.
नंतर मुळा मुठा नदीचा पुर ओसरला आणि पाणी पातळी कमी झाल्यानंतर मात्र या पुरातून वाहून आलेली सर्व घाण लोकांच्या निदर्शनास आली. कारण, या नदीपात्राच्या कडेला पुर आल्यामुळे पाणी दूरवर पसरले होते. त्यात हे पाणी काहीच्या शेतात तर काहीच्या घरात गेल्याचे पाहायला मिळाले पण या पाण्या मध्ये किती प्रमाणात घान वाहून आली हे पुर ओसरल्यानंतर पाहायला मिळाले. कारण नदी काठच्या शेतातील पिकांवर, झाडा-झुडपायावर आणि कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावर अक्षरशः प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीगचे ढीग अडकले आहेत. काही शेतकऱ्यांच्या तर शेतामध्ये पीक कमी आणि कचराच जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. यावरून किती घाण या पाण्याबरोबर उजनी धरणात जमा होत असेल. हा प्रश्न गंभीर आहे. अशी भावना व्यक्त होत आहे.