युनूस तांबोळी
शिरूर : ऊस शेती बाबत प्रचंड पाणी, रासायनीक खते आणी किटकनाशके वापरल्याने जमीनीमध्ये गवत उगवते. त्यामुळे ही शेतीचे ताळेबंद करून शेती व्यवसाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. जीवनचक्र बदलल्याने मानवी जीवन धोक्यात आले असून शेती व्यवसायात देखील त्याचा परिणाम झाला आहे. ऊस शेतीमध्ये किड आणि रोगाचे व्यवस्थापन करून कमीत कमी चुकीचे तंत्रज्ञान अवगत करून शेती व्यवसाय करावे लागणार आहे. असे मत वसंतदादादा शुगर इन्स्टिट्युट मांजरीचे किटक शास्त्रज्ञ शत्रुघ्न मगर यांनी व्यक्त केले.
मलठण (ता. शिरूर) येथे आय टी सी मिशन सुनहरा कला व घोडनदी उपखोरे जलसंसाधण व्यवस्थापन प्रकल्प यांच्या वतीने शाश्वत ऊस उत्पादन तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरीचे ऊस शास्त्रज्ञ सुरेश मानेपाटील यांनी ऊस लागवड, तंत्रज्ञान या विषयी माहिती दिली.
यावेळी प्रकल्प समन्वयक सागर तावडे, दिपक पडोळकर, शेतकी अधिकारी अंकुश आढाव, मुकूंद भुजबळ, कृषी विस्तार अधिकारी संजय शिंदे, दिपक पडोळकर, कृषी सहाय्यक गणेश ताठे, अशोक गायकवाड, मंडल अधिकारी प्रफुल्ल कामठे, सुनिल राजे, कृषी पर्यवेक्षक प्रदिप तांबे, किरण सालके, विक्रम पवार, अनिकेत भाकरे, नाना फुलसुंदर, मोहन थोरात, सुदाम गायकवाड आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
मानेपाटील म्हणाले की, फुटवा वाढविण्यासाठी मशागत करण्याचे तंत्रज्ञान अवगत करण्याची गरज आहे. ऊस शेतीचा अभ्यास करा. त्याचे तंत्रज्ञान अवगत करा. त्यातून फुटव्याचे नियोजन करून ऊस शेती व्यवसायाला भरभराटी आणण्याचे काम करा.