Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाण्याच्या मोटरीवरून वाद, अन् शेतकऱ्यावर केला कुऱ्हाडीने हल्ला; शिरूरमधील धक्कादायक घटना

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 28 July 2026, 11:14

न्हावरे: शिरूर तालुक्यातील पिंपळाची वाडी (निमोणे) येथे पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटरच्या वादातून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २७) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला. या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीसह दोन अनोळखी इसमांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत गणपत काळे (वय ५५, रा. पिंपळाची वाडी-निमोणे, ता.शिरूर, जि. पुणे)  हे घोड नदीकाठी असलेल्या त्यांच्या पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटरची पाहणी करण्यासाठी गेले होते. मोटारीवरील काट्या बाजूला करून पाणी तपासत असताना,अज्ञात व्यक्तीने संपत काळे यांच्या पाठीवर दगड फेकून मारला. त्यानंतर संजय राजाराम काळे यांनी समोर येऊन “तुझी मोटर आताच्या आता उचल, नाहीतर तुला सोडणार नाही,” अशी धमकी दिली. त्यानंतर हातातील कुऱ्हाडीने संपत काळे यांच्या डोक्यावर जोरदार वार केल्याचा आरोप फिर्यादीने फिर्यादीमध्ये केला आहे. या हल्ल्यात संपत काळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

जखमी अवस्थेत संपत काळे यांनी सुरेश बाळासो काळे यांना फोन करून मदत मागितली. त्यानंतर मयूर काळे व शिवाजी काळे यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी निमोणे येथून शिरूर ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.

या प्रकरणी फिर्यादी संपत काळे यांच्या तक्रारीवरून संजय राजाराम काळे व दोन अनोळखी इसमांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत.

 
योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? व्हायरल मेसेजवर केंद्र सरकारने केला खुलासा; जाणून घ्या सत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp