Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुरकुंभ एमआयडीसीत उद्योजकाला धमकी देत रसायनांची मागणी? शरद शितोळेंविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 8 September 2026, 11:55

दौंड, ता. 8 : कुरकुंभ (ता. दौंड ) एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीच्या संचालकाला वारंवार व्हॉट्सॲप कॉल करून धमकावणे, तसेच कंपनीकडून प्रक्रिया केलेला सॉल्व्हंट माल आणि मोकळे ड्रम ठरवून दिलेल्या दराने खरेदी करण्याची सक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी दिपक मुरारजी ठक्कर (वय ५७, कंपनी संचालक, रा. मुलुंड, पश्चिम मुंबई) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शरद शितोळे (रा. पांढरेवाडी, ता. दौंड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 308(4) आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपक ठक्कर यांची कंपनी कुरकुंभ एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक A/84 आणि A/89 येथे फार्मा व प्रिंटिंग केमिकल तयार करते. कंपनीच्या संचालकांना सप्टेंबर 2025 पासून शरद शितोळे याच्याकडून वारंवार व्हॉट्सॲप कॉल येत होते. कंपनीने प्रक्रिया केलेला सॉल्व्हंट माल त्याने सांगेल त्या दराने विकावा आणि कंपनीसाठी लागणारे मोकळे ड्रमही त्याच्याकडूनच खरेदी करावेत, अशी मागणी करीत होता. आणि या मागण्या मान्य न केल्यास कंपनीविरुद्ध खोट्या तक्रारी करण्याची आणि कंपनी बंद पाडण्याची धमकी देत होता. तसेच, कंपनीच्या बाहेर पडल्यावर एकेकाचे पाय तोडण्याची धमकी दिली होती.

शितोळे याने कंपनीशी कोणताही अधिकृत पत्रव्यवहार किंवा ई-मेलद्वारे व्यवहार न करता धमकावून मालाची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (DISH) यांच्याकडे कंपनीविरुद्ध खोट्या तक्रारी करून त्रास दिला आहे. कुरकुंभ एमआयडीसीतील इतर उद्योजकांनाही अशाच प्रकारे धमकावून मालाची मागणी केली जात असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

 

दरम्यान, शितोळे याच्या दहशतीमुळे उद्योजक तक्रार करण्यास धजावत नसल्याचेही त्यांनी सांगितले. कुरकुंभ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी धीर दिल्यानंतर आपण पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो दिवाळीत गोडधोड खाण्याचा विचार करताय? थांबा! ऐन सणासुदीत FDAची मोठी कारवाई; कर्नाटकवरून येणाऱ्या गाड्या अडवल्या अन् १० टन खवा, पनीर जप्त

Monday, 19 October 2026, 16:24

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ऑक्टोबरपूर्वी पगारवाढ होणार? किती रुपयांनी पगार वाढणार? मोठी अपडेट समोर…

Monday, 19 October 2026, 16:15

‘फार्मर आयडी’च्या नावाखाली अनधिकृत कार्डांचे वाटप! कृषी विभागाचा CSC केंद्रांना इशारा

Monday, 19 October 2026, 16:09

लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा मोठा निर्णय; महिलांच्या ७ योजनांना कात्री तर ४ योजना कायमच्या गुंडाळल्या

Monday, 19 October 2026, 15:58

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार, पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार? मुंबईतील बैठकीत महत्त्वाची चर्चा

Monday, 19 October 2026, 15:45

दरमहा मिळणार 9,250 रुपये! आर्थिक नियोजनाची चिंता मिटणार; ‘ही’ योजना देऊ शकते नियमित उत्पन्न

Monday, 19 October 2026, 15:24
Next Post

भोरमध्ये सर्पदंशाचा धोका वाढला! 3 महिन्यांत 123 घटना; जनजागृतीची गरज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp