Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: कुरकुंभ येथे पिकअप व ट्रॅक्टरच्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू, पिकअप चालक फरार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 3 December 2025, 11:53

दौंड, ता. 02: पुणे–सोलापूर (Daund News) महामार्गावरील कुरकुंभ परिसरात महिंद्रा पिकअप व ट्रॅक्टरचा झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये ट्रॅक्टरच्या पुढील भागाचे दोन तुकडे झाले होते. याप्रकरणी अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 02) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ (ता.दौंड) गावच्या हद्दीत पाटस बाजूकडुन कुरकुंभ बाजूकडे सर्विस रोड हा अपघात झाला.

 

संतोष बाबूराव वाघमोडे (वय-36, रा. रा.मलठण ता. दौंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे बंधू बापुराव बाबूराव वाघमोडे (वय-38) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष वाघमोडे हे ट्रॅक्टर चालक असून मंगळवारी पाटस बाजूकडुन कुरकुंभ बाजूकडे सर्विस रोडने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन खाली ट्राँलीसह निघाले होते. जात असताना पाटस बाजुकडून येणारे महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी (MH 42 M 5752) या गाडीवरील अज्ञात चालकाने गाडी भरधाव वेगात चालवून वाहतुकीच्या नियमनाकडे दुर्लक्ष करून ट्रक्टरच्या पुढील बाजूला जोराची धडक दिली.

या अपघातात ट्रक्टरच्या समोरच्या भागाचे दोन तुकडे झाले. यामध्ये संतोष वाघमोडे हे गंभीर व किरकोळ दुखापत झाले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय, दौंड येथे घेऊन गेले असता उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यानी दिली.

दरम्यान, याप्रकरणी अज्ञात चालकाविरूध्द दौंड पोलिस ठाण्यात भा.न्या.संहिता कलम 106(1),281,125a,125b,324(4),मो.वा.का 184,134/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पठाण करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
Nilesh Ghaywal: Another member of the Nilesh Ghaywal gang was arrested; 200 rounds were fired from a licensed pistol, police investigation started...

Nilesh Ghaywal: निलेश घायवळ टोळीतील आणखी एकाच्या आवळल्या मुसक्या; परवानाधारक पिस्तुलातून 200 राऊंड फायर, पोलीस तपास सुरु...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.