संदीप टूले
Daund News : दौंड, (पुणे) : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अचानक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर दौंड तालुक्यात त्याचे पडसाद उमटले आहेत दोन दिवस झाले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला आसून पदाधिकारी मात्र वेट अँड वॉच च्या भूमिकेत दिसत आहेत. (Daund News)
जे कार्यकर्ते राष्ट्रवादी आणि भाजपा ज्यांच्या बरोबर संघर्ष करीत आहेत. आज मात्र एकमेकांच्या पंगतीत जाऊन बसायचे की संघर्ष करायचा कारण हा प्रश्न पुढील राजकारणासाठी खूप महत्वाचा असून या निर्णयामुळे पुढील भवितव्य अवलंबून आहे. कारण दौंडचे राजकारण नेहमीच थोरात आणि कुल यांच्याच भोवती फिरते. (Daund News)
आत्तापर्यंत तिसरा कोणीही यांच्या मध्ये टिकला नाही. कारण दौंड तालुका हा बारामतीच्या शेजारी असल्यामुळे साहजिकच पवार घराण्याचे दौंडच्या राजकारणामध्ये नेहमीच लक्ष असते व येथे राष्ट्रवादी पक्ष्याला मानणारा वर्ग ही मोठा असून उमेदवार कोणीही असो हा वर्ग त्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो.
सत्ता संघर्षामुळे जशी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तशी दौंड तालुक्यामध्येही दोन गट तयार होतील असे जाणकार सांगत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते ही संभ्रमात असून जो पर्यंत राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेशआप्पा थोरात काही सांगत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्या गटात आहोत ते आम्हालाच माहीत नाही ते ज्या गटात जातील तो गट आमचा असे कार्यकर्ते उघडपणे सांगत आहेत. तसेच दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनीही माध्यमांसमोर येऊन अजून कुठलीही प्रतिक्रिया दिली नसल्यामुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत.
याबाबत बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप हंडाळ म्हणाले, “मी एक राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता होतो, आज जो काही आहे तो माजी आमदार रमेश थोरात यांच्यामुळे आहे. त्यामुळे आमचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आसेल.”