पुणे (Pune) येथील सिंहगड रोड भागात तीन व्यक्तींनी घराबाहेर लघवी करण्यास विरोध करणाऱ्या एका जोडप्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे तीन अज्ञात व्यक्ती तक्रारदारांच्या घरासमोर लघवी करत होते. दरम्यान, तक्रारदार निशा रविशंकर पटले (वय 27, रा. महादेव नगर, धायरी) यांनी विरोध केला असता. सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथे हि धक्कादायक घटना घडली आहे. तिन्ही आरोपींना जोडप्याला मारहाण केली. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून सिंहगड रोड पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथे हि धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी पहाटे तीन अज्ञात व्यक्ती तक्रारदारांच्या घरासमोर लघवी करत होते तक्रारदारांनी त्यांना घरासमोर लघवी का करत आहात असा प्रश्न विचारला असता. आरोपींना पती-पत्नींना हाताने आणि लोखंडी हत्यारांनी मारहाण केली आणि शिवीगाळ केली आणि पळून गेले. मारहाणीत हे जोडपे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान,सिंहगड रोड पोलिस पुढील तपास करत आहेत.