Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर येथे ट्रकचालकाची राहत्या घरात आत्महत्या ; कारण अस्पष्ठ

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 March 2025, 18:16

लोणी काळभोर, ता. 11 : अज्ञात कारणाने एका ट्रक चालकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतीलकाकडे कॉलोनी परिसरात घडली असून मंगळवारी (ता.11) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

महेश गणेश वेदपाठक (वय – 33, रा. थेऊर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश वेदपाठक हा अविवाहित असून तो आईवडिलांसोबत थेऊर परिसरात राहतो. महेश हा ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. तर महेशला दारूचे व्यसन असल्याचीही माहिती समोर येत आहे.

दरम्यान, महेश वेदपाठक हा मंगळवारी (ता.11) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरातील खोलीत गेला होता. त्याने आतून खोलीचा दरवाजा बंद केला होता. महेशच्या आईने आवाज देऊन दरवाजा वाजविला. मात्र आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस हवालदार महेश करे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने दरवाजा तोडला असता, घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत महेश वेदपाठक हा आढळून आला. लोणी काळभोर पोलिसांनी महेशला खाली काढून लोणी काळभोर येथील एका बड्या दवाखान्यात उपचारासाठी दाखले केले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.

 

महेश वेदपाठक याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी उरुळी कांचन येथील प्राथमिक रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला आहे. शवविच्छेदनाच अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. वेदपाठक यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दारूच्या व्यसनातून आत्महत्या केली असावी. असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

मानव अधिकार संरक्षण समिती हवेली तालुका उपनिरीक्षक पदी अभिषेक कांचन तर शहराध्यक्षपदी अखिल जाधव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp