पुणे : महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर (१ ऑगस्ट) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी माझे कार्यालय सुंदर कार्यालय या मोहिमेअंतर्गत “झिरो पेंडन्सी’ मोहिम तहसिल हवेली कार्यालयात राबविण्याचे आयोजन केले आहे.
१ जानेवारी २०२२ ते दिनांक ३१ जुन २०२२ अखेर तहसिल कार्यालयात प्राप्त प्रलंबित प्रकरणांची तसेच सहा महिन्यावरील प्रलंबित असलेली प्रकरणे निर्गत करणेकामी विशेष मोहिम राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार दिनांक २० जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत तहसिल कार्यालयातील सर्व संकलनांकडे प्रलंबित असलेली प्रकरणे निर्गत करणेकामी नियोजन करण्यात आलेले आहे.
त्यानुसार सर्व संकलनांना त्यांचेकडील प्रलंबितता अंतिम करणेबाबत सुचना देणेत आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मा. शासनाकडील दिनांक १५/०२/२०१८ रोजीचे शासन निर्णयानुसार तसेच मा. जिल्हाधिकारी यांचे माझे कार्यालय सुंदर कार्यालय या मोहिमे अंतर्गत देणेत आलेल्या सुचनानुसार कार्यवाही करणेबाबतही सर्वांना सुचित करण्यात आलेले आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.
सर्व संकलनांनी १ वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांची विगतवारी करून त्याची यादी तयार करावी व सदर प्रकरणे तात्काळ निर्गत करावीत.
प्रतिक्षाधीन प्रकरणांची मंडल निहाय यादी करून ३ महिन्यापेक्षा जास्त प्रलंबित प्रकरणांचे अहवाल मंडल अधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेवून त्याची निर्गती करणेबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना देणेत आलेल्या आहेत.
दररोज सकाळी ९.४५ ते दुपारी २.३० या वेळेत अभ्यांगतांना त्यांचे कामासाठी संबंधित संकलन लिपीकास भेटणेसाठी वेळ राखून ठेवणेत आलेला आहे.
दुपारी ३.०० नंतर प्रलंबित प्रकरणे निर्गती करणेबाबतचे कामकाज करणेचे असल्याने अभ्यांगतांना सदर वेळेनंतर संकलन लिपीकांना भेटता येणार नाही. तसेच दुपारी ३.०० नंतर येणा-या अभ्यांगतांची असलेली कामे लिहून घेणेसाठी रजिस्ट्रर आखणेत आलेले असून १ स्वतंत्र कर्मचारी लिहून घेणेसाठी नेमणेत येत आहे.
प्रलंबित प्रकरणांचा निपटारा झालेनंतर अभिलेखाचे अ, ब, क, ड निहाय वर्गीकरण करून ६ बंडल पध्दतीने दप्तर लावणेत येणार आहे.
कार्यालयाची स्वच्छता करून स्वच्छ कार्यालय ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. उपरोक्तपणे नियोजन करून सामान्य नागरिकांना त्यांची प्रशासकीय कामे जलदगतीने होणेसाठी तसेच तक्रारींचे प्रमाण कमी करणेसाठी मोहिम स्वरूपात कामकाजाचे नियोजन करणेत आलेले आहे.
सदर कालावधीमध्ये दुपारी ३.०० नंतर अभ्यांगतांना संकलन लिपीकास भेटता येणार नाही. तरी नागरीकांना निवेदन आहे की, सदर मोहिम यशस्वी करणेसाठी आपले अनमोल सहकार्य अपेक्षित आहे. सदर मोहिमेनंतर तहसिल कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे कमीतकमी राहतील अशी ग्वाही देणेत येत आहे.