CNG Strike News : लोणी काळभोर, ता.०३ : तेल कंपन्यांकडून सन २०१७ सालापासून पेट्रोल आणि डिझेलच्या डीलर मार्जिन दिला नाही. त्यामुळे तब्बल ६ वर्षापासून प्रलंबित असलेले मार्जिनची ७ कोटींची थकबाकी त्वरित द्यावी. अन्यथा पुण्यात गुरुवार (ता.१० ऑगस्ट) पासून सीएनजी पंपावर सीएनजी ची विक्री बंद करणार आहे. असा कडक इशारा पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने तेल कंपन्यांना दिला आहे. CNG Strike Ne
सीएनजी ची विक्री बंद करणार;
पुणे जिल्ह्यातील डीलर्सना ट्रेड मार्जिनची ७ कोटींची थकबाकी मिळवण्यासाठी पेट्रोल डीलर्स अससोसिएशन पुणे ने तेल कंपन्या आणि टोरेंट गॅस यांना यापूर्वीच भरपूर पत्र लिहिले आहे. CNG Strike News
तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली होती. त्यानंतर यासंबंधित मंत्रालयात अनेक वेळा पाठपुरावा करूनही अद्याप बैठकीचे इतिवृत्त प्राप्त झाली नाही. CNG Strike News
दरम्यान, एकाच जिल्ह्यातील ट्रेड मार्जिनमध्ये अशा प्रकारची असमानता राहणे शक्य नाही. आणि म्हणूनच शेवटी सर्व ४२ डीलर्सनी १० ऑगस्टपासून त्यांच्या खात्यात ट्रेड मार्जिनची रक्कम रिफ्लेक्ट होत नाही. तो पर्यंत सीएनजी पंपावर सीएनजीची विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. CNG Strike News
याबाबत बोलताना पुण्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले कि, असोसिएशनच्या डीलरला २०१७ नंतर एक पैसाही दिला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आणि इतर खर्च जसे की वीज, बँकेचे व्याज दर आणि आमच्या व्यापाराशी संबंधित सर्व खर्च वाढले आहेत. पण तरीही आमचे मार्जिन २०१७ पासून राहिले आहे. तेल कंपन्यांनी प्रलंबित डीलर मार्जिन त्वरित द्यावे. तसेच आमचा सामान्य जनतेची गैरसोय करण्याचा हेतू नाही. परंतु, आमच्या आर्थिक संकटामुळे आम्ही सर्व संबंधितांना हे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे.