राहुलकुमार अवचट
यवत : पाटस येथील हॉटेल ७/१२ च्या गल्ल्यातून दोन हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गणेश बापु काळदाते यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाटस गावच्या हद्दीतील हॉटेल ७/१२च्या गल्ल्यातून ( कॅश काऊंटर) टेबलच्या ड्रॉवरचे कुलूप तोडून २ हजार रूपयांची अज्ञात व्यक्तीने चोरी केली. ही घटना ८ डिसेंबरला घडली आहे.
याप्रकरणी २३ डिसेंबरला रोजी गणेश बापु काळदाते यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भगत हे करत आहेत.