(Cantonment Board Recruitment) पुणे : देशातील 57 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका संरक्षण मंत्रालयाने जाहीर केल्या होत्या. त्यामुळे बोर्डातील इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारीही सुरु केली होती. तसेच इच्छुकांनी 300 रुपये शुल्क देऊन उमेदवारी अर्ज भरले आहेत. मात्र अचानक मंत्रालयाने बोर्डाच्या निवडणुका रद्द करण्याची घोषणा केल्याने इच्छुकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात आता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इच्छुकांनी आमचे अर्ज परत घ्या आणि पैसे परत द्या अशी मागणी केल्याने प्रशासनाची चांगली पंचाईत झाली आहे.
निवडणुका जाहीर झाल्याने मतदार नोंदणीला देखील सुरुवात झाली होती. तसेच विविध प्रश्नांवर चर्चा रंगली होती. यानिमित्ताने बोर्डाच्या कारभारामुळे या भागातील विकास कसा झाला नाही. यावरुन टीका ही होत होती. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली होती. मात्र अचानक मंत्रालयाने निवडणुकीला स्थगिती दिल्याने इच्छुकांचा चांगलाच हिरमुड झाला आहे.
एका अर्जासाठी 300 रुपये शुल्क…!
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची सार्वत्रिक निवडणूक 17 फेब्रुवारीला जाहीर झाली होती. 30 एप्रिल रोजी मतदान होणार होते. मात्र, संरक्षण विभागाने अचानक निवडणूक रद्द केली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आली. त्यात एका अर्जासाठी 300 रुपये शुल्क आकारण्यात आले.
अनेकांनी पाच ते दहा अर्ज खरेदी केले होते. खरेदी केलेल्या अर्जांचे काय करायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. तर, काहींनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे आम्ही घेतलेले अर्ज परत घ्या आणि भरलेले पैसे परत द्या, अशी मागणी केली. असा प्रसंग प्रशासनापुढे पहिल्यांदाच आला आहे. त्यामुळे पैसे परत कसे द्यायचे? याविषयी वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.
कॅन्टोन्मेंटची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यासाठी एकूण पाच अर्ज घेतले. त्यासाठी दीड हजार रुपये शुल्कही भरले आहे. शपथपत्र नोटरी करून घेतले असून, उमेदवारी अर्ज दाखल करता कायदेशीर पेच निर्माण होऊ नये, यासाठी वकीलही नेमला आहे. परंतु, अचानक निवडणूक रद्द झाल्यामुळे उमेदवारी अर्जासाठी घेतलेले शुल्क परत करावे. अशी प्रतिक्रिया इच्छुक उमेदवार जयकुमार राघवाचारी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune Crime | पुणे : धक्कादायक! फोटो मॉर्फ करून अश्लील प्रोफाईल बनविले; आईसह मुलीचा विनयभंग!
Pune News : कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद!